अलिबाग, अमूलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील श्री महावीर चौक येथील ज्वेलर्स मध्ये चोरी करणाऱ्या महिला आरोपी वनिता प्रदीप वाघमारे (कात्रज,पुणे) हिस पियुष मेहता यांनी पोलीसाना बोलवून त्यांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी माहिती की, अलिबाग शहरातील मौजे श्री महावीर चौक येथे असणाऱ्या श्री ज्वेलर्स येथे दिनांक 03/09/2023 रोजी 12:25 वा च्या सुमारास महिला आरोपी वनिता प्रदीप वाघमारे (कात्रज,पुणे) हिने चैन खरेदी करण्याच्या बहाण्याने फिर्यादी रमेश बखतावमलजी मेहता ( श्री महावीर चौक ,ब्राह्मण आळी, अलिबाग) यांचे श्री ज्वेलर्स हया दुकानामध्ये येवुन दुकानात काम करणा-या माणसांचे लक्ष नाही हे पाहुन हात चालाखी करुन दुकानात ट्रे मध्ये असलेली 95,000/- रुपये किमंतीची 15 ग्रॅम वजनाची 1 सोन्याची चैन महिला आरोपीत हिने स्वताचे फायदयाकरीता फिर्यादी यांचे संमतीशिवाय चोरी करुन गेली होती.सदर महिला ही दिनांक 10 सप्टेंबर2023 रोजी परत पुणे स्वार गेट येथून बसने अलिबाग येथे आली होती.सदर महिला ही चोरी करण्याच्या उद्देशाने प्रथम सन गोल्ड ज्वेलर्स मध्ये गेली होती आणि तद्दनंतर ती रॉयल ज्वेलस येथे गेली असल्याची बातमी श्री ज्वेलर्स चे मालक रमेश मेहता यांच्या मुलगा पियुष मेहता याला समजताच तो रॉयल ज्वेलर्स च्या बाहेर जाऊन थांबला आणि सदर महिलेची शहानिशा केली असता खात्री झाल्यानंतर अलिबाग पोलिसांना माहिती देताच पोलिस काही मिनिटाच्या अवधीत येऊन सदर महिलेस ताब्यात घेतले आहे.सदर महिलेस पोलिसी खाक्या दाखविताच तिने चोरी केल्याचे कबुल केले आहे.