रोहा कोलाड रोडवर लाखोंचा अंमली पदार्थ जप्त:दोन आरोपींना अटक तर एक फरार

अलिबाग, अमूलकुमार जैन

रायगड जिल्हयातील रोहा कोलाड रस्त्यावर असणाऱ्या मराठा पॅलेस हॉटेल जवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडच्या पथकाने अंमली पदार्थ जप्त करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एक फरार झाला आहे.

रोहा तालुक्यातील रोहा कोलाड रस्त्यावरील मराठा पॅलेस जवळ एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्या मार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला प्राप्त झाली होती.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम,सहाय्यक फौजदार दीपक मोरे, पोलीस हवालदार विकास खैरनार पोलीस हवालदार रुपेश निगडे, पोलीस हवालदार सुदीप पहेलकर ,पोलीस शिपाई अक्षय जगताप, पोलीस शिपाई स्वामी गावंड, पोलीस शिपाईओमकार सोंडकर या पथकाने सापळा रचून कारवाई केली असता रुपये 5,34,000/-किंमतीचा चरस हा अमली पदार्थ एकूण 1068 ग्रॅम वजनाचा प्रति ग्रॅम 500/- रु प्रमाणे जप्त केले आहे.यावेळी देवेंद्र जयदास पाटील( वय -26 वर्ष ),भारत आत्माराम पालेकरवय (वय-30वर्ष ,दोन्ही रा- जिवणाबंदर श्रीवर्धन , ता-श्रीवर्धन ,जि – रायगड)याना अटक केली असून राजन पांडूरंग चेवले (रा- जिवणाबंदर श्रीवर्धन , ता-श्रीवर्धन ,जि – रायगड) हा आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी कोलाड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 91/2023, एन डी पी एस कायदा 1985 कलम 8 क , 20ब ,II क अधिनियम अन्न्वये गुन्हा दाखल केला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page