अलिबाग, अमूलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील महसूल विभागातील अववल कारकून रवी दशरथराव सोनकांबळे,(वय 45 वर्षे, अव्वल कारकून तहसील कार्यालय कर्जत रा.ठि. अरिहंत टॉवर, पहिला मजला, सी विंग, खोली क्रमांक 103, खोपोली, तालुका खालापूर जिल्हा रायगड.वर्ग 3 ) यास जप्तीचे वॉरंट बजावण्याकरिता दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अलिबाग येथील येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
तक्रारदार(पुरुष वय 36 वर्षें )यांनी महारेरा या ठिकाणी बिल्डर विरुद्ध तक्रार करून रक्कम रुपये 13,91,135/- एवढ्या रकमेचे जप्ती वॉरंट प्राप्त केले होते. सदर जप्ती वॉरंटची बजावणी करण्याकरिता दिनांक 21/09/2022 रोजी जप्ती वॉरंट जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड या ठिकाणी जमा केले होते सदर जप्ती वॉरंट बजावणी करिता तहसील कार्यालय, कर्जत या ठिकाणी पाठविण्यात आलेले होते.नमूद जप्ती वॉरंट बजावणी करण्याकरिता आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून 20,000/- रुपये स्वीकारलेले होते व पुन्हा आज दिनांक 11 सप्टेंबर2023 रोजी रक्कम रुपये 10,000/- लाचेची मागणी केली व सदरची लाचेची रक्कम 10,000/-रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र चे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे,अप्पर पोलीस अधीक्षक
अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाल लाच लुचपत विभाग रायगडचे उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अरुण करकरे,सहाय्यक फौजदार विनोद जाधव, सहायक फौजदार शरद नाईक, पोलीस हवालदार महेश पाटील, यांनी केली आहे
जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी दुरध्वनी क्रमांक ०२१४१- २२२३३१ वरसंपर्क साधाण्याचे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांनी केले आहे. लाचलूचपत विभागाने महसूल विभागातील कर्मचारी यांच्यावर कारवाई केली आहे.या कारवाईमुळे पुन्हा एकदा सरकारी अधिकारी कर्मचारी लाच घेतांना पकडले जाण्याने शासकीय यंत्रणा हादरली आहे.