उरण, विरेश मोडखरकर
उरणच्या चिरनेर गावामध्ये लोकवस्तिमध्ये आढळून आलेल्या भल्यामोठ्या अजगर सापाची फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे जैवंत ठाकूर यांनी सुटका केली आहे. फ्रेंड्स ऑफ नेचर ही संस्था गेली अनेक वर्षे निसर्ग संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाचे काम करत आहे. त्यांच्या या कामाला आता सामान्य नागरिकांमधून देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी चिरनेर गावामध्ये दहा फूट लांबिचा अजगर साप दिसून आला असता, तात्काळ जैवंत ठाकूर यांना बोलावण्यात आले. यावेळी हा अजगर पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आला. यावेळी फॉनचे निकेतन ठाकूर, पत्रकार जगदीश तांडेल, पत्रकार आशिष घरत उपस्थित होते.
बातमी आवडल्यास सबस्क्राईब, शेअर आणि लाईक जरूर करा….