ONGC तेल गळती मुळे झालेल्या नुकसानाची भरापाई मिळण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक

उरण, प्रतिनिधी

गुरुवारी पहाटे उरण तालुक्यातील ONGC प्रकल्पतून तेल गळती झाली होती. हे तेल येथील शेतामध्ये तसेच समुद्र किनार्यावर मिसळल्याने, येथील नागरिकांच्या शेतीचे आणि मत्स्यव्यावसायाचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. भरपाई मिळावी यासाठी ग्रामस्थांनी प्रकल्पच्या गेटवर घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर धडक दिली.

व्हिडीओ पाहण्यासाठी ☝️☝️☝️ क्लिक करा

उरण तालुक्यातील नागाव हद्दीमध्ये नैसर्गिक तेल आणि वायू निर्मिती प्रकल्प (ONGC) उभारण्यात आला आहे. या प्रकल्पमधून तयार होणारे तेल आणि गॅसमुळे देशाला मोठा आर्थिक नफा होत आहे. मात्र येथील स्थानिक नागरिकांनी पिकत्या जमिनी देऊन प्रकल्पसाठी आणि राष्ट्रहितासाठी योगदान दिले असतानाही, येथील स्थानिकाना उपेक्षिताचे जीवन जगावे लागत आहे. गुरुवारी पहाटे येथील प्रकल्पमधून कच्च्या तेलाची गळती झाली होती. येथील मांगीन देवी मंदिरालगत असणाऱ्या नाल्यातून ही गळती होऊन, तेल समुद्र किनार्यावर पसरले होते. ONGC प्रकल्प प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच नाल्यावाटे बाहेर येणारे तेल रोखण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. तर पुढील तीन दिवस समुद्र किनार्यावर आणि नाल्यात पसरलेले तेल साफ करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यावेळी मजु्रांसह आद्ययावत यंत्रणा राबविण्यात आली. मात्र तेल गळतीनंतर बाहेर आलेले तेल येथील पिकत्या शेत जमिनीमध्ये आणि समुद्राच्या पाण्यामध्ये मिसळल्याने, शेतीचे नुकसान झाले आहे. तर शेतामधील साठवून राहिलेले तेल जमिनीमध्ये मुरल्याने, पुढी अनेक वर्षे येथे पीक घेता येणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर समुद्र किनार्यावर जवळपास एक ते दीड किमी तेल पसरल्याने येथील किनारी भागावरील मासे मृत आढळले असून, येथील समुद्रीय जीव ज्यावर स्थानिक लोक आपले उदरनिर्वाह करत आहेत, ते नष्ट झाले असल्याने, येथील मच्छिमार बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता, नुकसानग्रस्त नागरिकांनी ONGC प्रकल्पच्या गेटवर निदर्शने केली. यांनंतर लॉन्ग मार्च काढत थेट तहसील कार्यालयावर धडक देत, नुकसान भरपाई मिळावी या माफक अपेक्षेतून तहसीलदार उद्धव कदम यांच्याशी झालेल्या प्रकारबाबत चर्चा करून, निवेदन देण्यात आले.

बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि कॅमेन्ट्स जरूर करा…..

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page