उरण, विरेश मोडखरकर
लायन्स क्लब द्रोणागिरी यांच्यावतीने उरण तालुक्यातील सहा ठिकाणी एकाचवेळी अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. तर या कार्यक्रमात उरण तालुका मराठी पत्रकार संघाने सहभाग घेऊन, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिळाची कामगिरी बाजावली.

जागतिक स्तरावर लायन्स क्लब मोठयाप्रमाणात कार्य करत असून, भारतामध्येही लायन्स क्लबचे कार्य जोमाने सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील द्रोणागिरी नोड मधून काम करणारी “लायन्स क्लब द्रोणागिरी” ही शाखा देखील येथील भागातील नागरिकांसाठी महत्वपूर्ण काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी उरण तालुक्यातील सहा ठिकाणी एकाचवेळी अन्नदान करण्यात आले. उरण नाईकनगर झोपडपट्टी, चारफाटा, राजपाल नाका, गणपती चौक, इंदिरा नगर झोपडपट्टी आणि बोरी पाखाडी या सहा ठिकाणी हा कार्यक्रम राबाविण्यात आला.
बातमी आवडल्यास सबस्क्राईब, लाईक आणि शेर जरूर करा….