उरण, प्रतिनिधी
उरणमध्ये शुक्रवारी मॉकड्रिल करण्यात आली. उरण पोलीस ठाणे, सिडको अग्निशमन दल, ग्रामीण रुग्णालय आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून हे ड्रिल पार पडले. पोलिसांनी यावेळी शहरातून पथसंचालन करून, पोलीस दल सक्रिय असल्याचे दाखवून दिले आहे.
गणेशोत्सव आणि त्यासोबतच काही दिवसातच सुरु होणारे सण पाहता, या काळात कोणताही अनुचित प्रकार घडूनये. तसेच कायदा सुव्यवस्था आबादीत रहावी या दृष्टीने उरण शहरामध्ये एका मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. या ड्रिलमध्ये उरण पोलीस, सिडको अग्निशमनदल, ग्रामीण रुग्णालय आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांकडून दंगल विरोधी कारवाईचा सराव करून, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तयार असल्याचे दाखवून देण्यात आले. तर यावेळी पोलिसांनी उरण शहरातून पथसंचालन केले.
बातमी आवडल्यास सबस्क्राईब, शेअर, लाईक जरूर करा…