उरण, प्रतिनिधी
उरण तालुक्यातील कोप्रोली गावाच्या वेशीवर मुख्य रस्त्यावर दोनही बाजूस मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. या कचऱ्यामुळे येथील परिसरात दुर्गंधी आणि घाणीचे सामराज्य पसरले आहे. मात्र याकडे ग्रामपंचायात दुर्लक्ष करत असल्याने, स्वछ भारत अभियान कचऱ्यात अडकला असल्याचे म्हटले जात आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “स्वच्छ भारत” अभियान राबवण्यात आले होते. तर या अभियानाअंर्गत गावागावांना स्वच्छतेसाठी पुढकार घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. मात्र उरण तालुक्यातील कोप्रोली – चिरनेर या मुख्य मार्गवर दोनही वाजुला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. यामुळे स्वच्छता अभियानाला येथे फाटा देण्यात आल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण परिसरातील कचरा येथील रस्त्याच्या दोनही बाजूला टाकण्यात आल्याने येथील परिसरात मोठी दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरल्याचे पहायला मिळत आहे. ज्यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांमध्ये तसेच येथील परिसरात राहणाऱ्यांमध्ये रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बातमी आवडली असल्यास सबस्क्राईब, शेअर आणि लाईक जरूर करा…..