नेरळ, प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील शिव छत्रपती सांस्कृतिक भवन मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रीय पातळीच्या कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शोटोकाँन कराटे असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेत नेरळ येथील सन बुडोकोण कराटे ऍकॅडमी मधील मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. तर यासह त्यांनी मोठे यश संपादन केले आहे. या स्पर्धेत अवधूत आहिर, आर्यण जाधव, अर्णव म्हसे यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके तर ध्रुवेद जंगले, तन्मय लांघी यांनी सुवर्ण आणि रोप्यपदके तसेच कल्पेश शिंगाडे यांनी रोप्यपदकाची कमाई केली. त्यांना नेरळ सॅन बुडोकोण कराटे असोसिएशनचे प्रशिक्षक संतोष शिंदे , हिरामण गवळी यांनी मार्गदर्शन केले होते