“माय मराठी खाद्य महोत्सव”,पिल्लई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज रसायनी, तर्फे अभिनव उपक्रम

रसायनी, श्वेता भोईर

पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस, रसायनी येथे “माय मराठी” या शीर्षका अंतर्गत अस्सल मराठमोळ्या खाद्य पदार्थांचा फूड फेस्टिवल अर्थात खाद्य महोत्सव नुकताच संपन्न झाला. पिल्लई कॉलेज रसायनीच्या हॉटेल मॅनेजमेंट शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या खाद्य महोत्सवाचे अतिशय उत्तम आयोजन केले होते. उकडीच्या मोदकापासून ते थेट कोल्हापुरी तांबडा रस्स्या पर्यंत कित्येक अस्सल मराठमोळे पदार्थ तयार करून यावेळी विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना त्याची चव चाखण्याची संधी दिली. या महोत्सवासाठी दिग्ग्ज मान्यवरांची उपस्थितीत लाभली. यावेळी हॉटेल रॅडिसनचे जनरल मॅनेजर जी. शंतनू तसेच एच. आर. मॅनेजर आशिष सर त्याच प्रमाणे हॉटेल व्यवसायातील बरेच शेफ्स आणि संचालक मंडळी आवर्जून उपस्थित होते.

महोत्सवात उपस्थित पाहुण्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की मराठी खाद्य संस्कृती इतकी वैविध्यपूर्ण आहे. परंतु दुर्दैवाने तारांकित हॉटेलात आणि आंतरराष्टीय स्तरावर त्याची हवी तशी दखल घेतली जात नाही अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान पिल्लई रसायनी येथील हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हा माय मराठी खाद्य यात्रेचा उपक्रम राबवून मराठी खाद्य प्रकारांना बाजारात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, याचे सर्वानी कौतुक केले.

कोकणाचा विकास झपाट्याने होत आहे. लोकनेते दि. बा. आंतरराष्ट्रीय विमानतळ, पंचतारांकित हॉटेल्स, रेल्वे विस्तार इत्यादी सगळ्या क्षेत्रात हॉस्पिटॅलिटी सेक्टर (सेवा विभाग) ची भूमिका मोठी आहे. त्यासाठी हॉटेलींग संदर्भातील कुशल मनुष्यबळाची खूप आवश्यकता असणार आहे. काळाची पावले ओळखून कोकणवासीयांना रॊजगार आणि व्यवसायाची संधी मिळावी म्हणून पिल्लई कॉलेज, रसायनी तर्फे हॉटेल मॅनेजमेंट संबंधित खास तंत्रशिक्षण देण्याचे काम सुरु केले आहे. भूमी पुत्रांना कोकण विकासात प्रधान्य दिले जावे ही शासन भूमिका आहे. त्याला पूरक म्हणून येथील भूमी पुत्र तरुण, तरुणींना खास हॉटेलिंग क्षेत्राचे प्रशिक्षण दिले तर कोकणवासीयांना याचा नक्कीच आर्थिक आणि बौद्धिक विकास होईल.
डॉ. के एम वासुदेवन पिल्लई
चेअरमन आणि सीईओ – महात्मा एजुकेशन सोसायटीज पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page