अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या प्रयत्नाला यश; बोकडविरा मार्गे एसटी बस सुरू

उरण, वैशाली कडू

बोकडविरा सिडको कार्यालयासमोरील रस्त्यावरील पूल नादुरुस्त झाल्याने गेली अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून एसटी व एनएमएमटी बसची वाहतूक बंद करण्यात आली होती. याचा नाहक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत होता. याबाबत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने याचा पाठपुरावा सातत्याने करून अखेर एसटी प्रशासनाला नमवत एसटी बसच्या काही फेऱ्या सुरू करण्यास भाग पाडले आहे.

सिडको फुंडे पूल नादूरुस्त झाल्यामुळे गेली तीन वर्षे उरण पनवेल, दादर बस व इतर बस सेवा बोकडविरा मार्गे बंद केल्यामुळे बोकडविरा,पाणजे, फुंडे, डोंगरी,म.रा.वि.म.वसाहत मधील विद्यार्थ्यांना, कामगार, सर्वसामान्य प्रवासी, रोजगाराला जाणाऱ्या महिलांना आर्थिक त्रास सहन करावा लागत होता. सदर नादुरुस्त पूल सिडकोने त्वरित दुरुस्त करावा म्हणून सामाजिक संघटना, पत्रकार संघटना व नागरिकांनी वारंवार मागणी करून देखील याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात होते. त्यानंतर सदर बस सेवा ही द्रोणागिरी नोड मधून सुरू करण्यात आली. परंतु वेळ बरोबर पैशांचाही भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत होता. सदर बस सेवा द्रोणागिरी नोड मधून ही बिल्डर लॉबीच्या सोयीसाठी केली जात असल्याचा आरोप प्रवाशी वर्गाकडून केला जात होता.

जरी पर्यायी रस्ता तयार असला तरी सदरचा पूल कधी दुरुस्त होणार असा सवाल उपस्थित करून अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या माध्यमातून गेली दोन वर्षे पाठपुरावा सुरू आहे. दि.३०/६/२०२३ रोजी मुंबई येथे मुख्यालयात निवेदन देऊन बोकडविरा मार्गे एस.टी.बसाचा मार्ग करण्यात यावा अशी मागणी केली. त्याचा गेली तीन महिने पाठपुरावा केला. दिनांक १६/९/२०२३ रोजी तहसीलदार, आणि आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. आगारप्रमुखांनी सोमवार दि. १८ सप्टेंबर पासून बस सुरू केली आहे।. जनवादी महिला संघटनेला काही सकाळच्या बस फेऱ्यांचं वेळा पत्रक ही पाठवलं आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येप्रमाणे बस फेऱ्या वाढविण्यात येतील, आणि सध्या तिकिट जून्या पद्धतीने देतील असे ही सांगितले आहे.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या प्रयत्नाला अखेर यश आल्याने प्रवाशी वर्गात व संबंधित गावजवलील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी आवडल्यास जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा…

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page