अलिबाग:-अमूलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील मुरुड बाजारपेठ येथे पायल चंदन जैन,क्रिश चंदन जैन,अशोक नैनमल जैन,उषा नैनमल जैन,झलक भैरव जैन,पायल चंदन जैन हिचा मावस भाऊ यांनी बेकायदेशीररित्या घरात घुसून सहा जणांकडून मारहाण प्रकाश गांधी यांना मारहाण केल्याप्रकरणी पुष्पा प्रकाश गांधी, (वय-45 वर्षे, व्यवसाय-गृहिणी, मुळ रा. ए 62पालन सोजपाल बिल्डींग, एस.के. भोले रोड, – दादर वेस्ट, मुंबई 400028, सध्या रा. मुरूड बाजारपेठ, ता. मुरूड) यांनी मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती की, मुरुड बाजारेठ येथे दिनांक 18/09/2023 रोजी सायंकाळच्या वेळी फिर्यादी पुष्पा प्रकाश गांधी यांना त्यांची बहीण वंदना हिने अखत्यापत्र दिलेल्या तिच्या घराच्या/दुकानाच्या हिस्याच्या घरात आरोपी आरोपी भाउ अशोक नैनमल जैन, व आरोपी उषा नैनमल जैन यांनी आरोपीत पायल जैन व क्रिश जैन चिथावणी केली की, हे तुमचे घर आहे तुम्ही घरात जा असे सांगून सर्व आरोपी हे घरात जबरदस्तीने घरात/दुकानात घुसून असलेल्या सामानाची उडवा उडव करून तसेच किचन मध्ये जावून तेथे देखील नुकसान करून सर्व आरोपीत यांनी शिवीगाळी व धमकी देऊन आरोपीत क्रिश जैन याने किचनमधुन लाटणी घेवुन फिर्यादी यांचे पती प्रकाश गांधी यांना लाटणीने मारण्यासाठी धावत जाऊन त्याने हाताबुक्याने मारहाण केली.
याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात मुरूड पोलीस ठाणे गु रजि. नं. No. 149/2023 भा.द.वि.स. कलम 143, 147, 149, 323,427, 351, 109, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार जनार्दन गदमले है करीत आहेत.
बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा…