उरणमध्ये दीड दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन

उरण, विरेश मोडखरकर

आज दीड दिवसाच्या बाप्पांचे राज्यभरात विसर्जन पार पडले. उरण तालुक्यातील विमला तलाव, मोरा जेट्टी, भावरा तलाव, नागाव समुद्र किनारा या मुख्य विसर्जन ठिकाणी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. तर येथील गावागावांमधील विसर्जन घाटांवर देखील घरगुती बाप्पांचे विसर्जन पार पडले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर महत्वाच्या विसर्जन ठिकाणी नागरी सौरक्षण दलाकडून प्रथमपाचार सुविधा देण्यात आली होती. नगर परिषदेकडून विमाला तलाव येथे विसर्जनामध्ये कोणतीही अडचण येऊनये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली. उरण पोलीस हद्दीमधील १७३० आणि एक सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन आज करण्यात आले.

बाप्पांच्या विसर्जनाचे काही निवडक फोटो “नवराज्य”च्या चाहत्यांसाठी

एन. आय. हायस्कुलचे निवृत्त शिक्षा शाम कुलकर्णी यांचा बापा….

विमला तलाव येथे बाप्पांचे विसर्जन करताना देऊळवाडी विसर्जन मंडळाचे सदस्य

आपला बाप्पा विसर्जनासाठी घेऊन जाताना….

विसर्जनपूर्वी बाप्पांची आरती करताना भाविक…..

नागरिसौरक्षण दलाकडून प्रथमोपचाराची व्यवस्था.

निवृत्त पोलीस तिलोर यांच्या घरचा बाप्पा.

बाप्पांची वाजत गाजत मिरवणूक काढून विसर्जनाला नेताना

फोटो आवडले असल्यास लाई, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.

आपल्या बापाचे फोटो “नवराज्य” मध्ये प्रसिद्धीसाठी ९१५२५२६६३३ या क्रमांकावर बाप्पांचा फोटो आणि माहिती पाठवा.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page