उरण, वैशाली कडू
उरण बोरी येथील हर्ष संतोष पवार यांनी शाडूच्या मातीपासून आपल्या हाताच्या कौशल्याने सुबक अशी गणेशाची मूर्ती साकारली आहे. हर्षच्या कलागुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उरण सामाजिक संघटनेचे सचिव व कामगार नेते संतोष पवार व शिक्षका सौ. प्रमिला पवार यांचा सुपुत्र हर्ष पवार याला कलेची सुरुवातीपासूनच आवड होती. त्यात शिक्षण सुरु असतानाच हर्षने जेजे आर्ट्स स्कुलमध्ये प्रवेश मिळवीत कलेचे धडे गिरविले. कलेचे यश संपादन करीत हर्षने अनेक सुबक अशा पेंटींग काढल्या आहेत.
यावर्षी हर्षने गणरायाच्या कलेची तयारी करीत त्याचे प्रात्यक्षिक अनेक ठिकाणी करून दाखविले आहे. आज गणेशोत्सवाचे औचित्य साधत स्वतःच्या घरात स्थानापन्न करण्यात येणाऱ्या गणेशाची मूर्ती कोणतेही साचे याचा वापर न करता स्वतःच्या हाताच्या कौशल्याने सुबक अशी गणेशाची मूर्ती स्थानापन्न केली आहे. हर्ष पवार याच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. यापुढेही हर्ष पवार याच्या हातून कलेची प्रात्यक्षिकं उरणकरांना पहावयास मिळणार आहे.

हर्ष पवार याने ज्यांना गणेशाची मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले त्या सर्वांनी पुढच्या वर्षी शाडूच्या गणेशाची मूर्ती बनवून स्वतःच्या घरात स्थानापन्न करण्याचा संकल्प केला आहे. शाडूच्या मातीपासून बनविलेली गणेशाची मूर्तीमुळे भविष्यात पर्यावरण प्रदुषण टाळणे शक्य होणार आहे. तसेच यासाठी सर्वांनी मिळून पुढाकार घेणे आवश्यक आहे.
बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा…..