अमितदादा नाईक यांच्या बाप्पाचे पत्नीसह घेतले दर्शन
अलिबाग, अमूलकुमार जैन
गणपती बाप्पा मोरया …मंगलमूर्ती मोरया, या जयघोषाने सार्वजनिक गणपती बापप्पांसोबत घरगुती बाप्पा देखील विराजमान झाले आहे. याचबरोबर अलिबाग- मुरुड चणेरा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अमितदादा नाईक यांच्या अलिबाग येथील म्हात्रोळी निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागत असून, यावेळी अमितदादा नाईक यांच्या म्हात्रोळी निवासस्थानी विघ्नहर्ता गणेशासाठी खास आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. यावेळी इंडियन टीम कॅप्टन रोहित शर्मा यांनी आपली पत्नी रितिका हिच्यासोबत नाईक कुटुंबियांच्या बाप्पाचे दर्शन घेतले. रोहित शर्मा अलिबागमध्ये आल्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून फोटो काढण्यासाठी एकच गर्दी झाली होती.