उरण, वैशाली कडू
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे खंदे समर्थक मार्तंड नाखवा यांची महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवड जाहीर होताच मार्तंड नाखवा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ऑल इंडियन काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणूगोपाळ यांनी मार्तंड नाखवा यांना नियुक्ती पत्र दिले.
उरण तालुक्यातील करंजा गावचे मार्तंड नाखवा हे कोळी समाजाचे नेते म्हणून ओळखले जात आहेत. त्यांनी मच्छीमारांच्या अनेक समस्यां मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न केले आहेत. याची दखल घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे व रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी मार्तंड नाखवा यांची शिफारस केली होती. याची वरिष्ठांनी दखल घेऊन ऑल इंडियन काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणूगोपाळ यांनी मार्तंड नाखवा यांची महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली.
मार्तंड नाखवा यांची महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी आज जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी जिल्हाध्यक्षांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अकलाक शिलोत्री, जिल्हा सरचिटणीस गणेश सेवक आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी शुभेच्छा देऊन राज्यातील मच्छीमारांच्या समस्यां जाणून घेण्यासाठी लवकरच मेळावा घेऊन समस्यां मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी आपल्यावर पक्षांनी जी जबादारी दिली आहे, ती यशस्वीपणे पार पाडून फिशरमनच्या समस्यां मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.