रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सभासदांना १२.५०% लाभांश जाहीर, ५००० कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण करणार

अलिबाग, अमूलकुमार जैन

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सभा अलिबाग येथील केंद्र कार्यालयात रविवारी संपन्न झाली. या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांना १२.५०% लाभांश सलग तिसर्‍या वर्षी जाहीर करत, सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले. बँकेने सन २०२२-२३ या वर्षामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करीत रु.५१.०० कोटी इतका ढोबळ नफा मिळविलेला असून रु.२५.८४ कोटी इतका निव्वळ नफा बँकेला झालेला आहे. पोलिसांची मुले शैक्षणिकदृष्ट्या पुढे जाणे सुद्धा अधिक महत्वाचे असून त्यांच्या पाल्यास शैक्षणिक कर्जामध्ये २% सवलत देण्यात येईल असे प्रतिपादन यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी बँकेच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केले. यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, जेष्ठ सभासद शंकरराव म्हात्रे, बँकेचे सर्व विद्यमान संचालक, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, बँकेतील अधिकारी वर्ग , कर्मचारी वर्ग आणि सभासद, भागधारक उपस्थित होते.

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकने सातत्यपूर्ण कामगिरी करत ऑगस्ट २०२३ पर्यंत रु.४९२४ कोटींचा व्यवसायाचा यशस्वी टप्पा गाठला आहे, या आर्थिक वर्षात हा टप्पा रु.५५०० कोटींच्या पुढे असेल तसेच बँकेने रु.५८४ कोटींचा स्वनिधीचा टप्पा पार केला आहे, बँकेच्या दृष्टीकोनातून हा अतिशय महत्वाचा टप्पा असून यापुढील काळात हा स्वनिधी १००० कोटींच्या पुढे असेल असे बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी सभासदांना आश्वासित केले. शिवाय त्यांनी आपल्या मनोगतामध्ये बँकेचे ग्राहक, सभासद, भागधारक यांचे आभार व्यक्त करून कर्मचार्‍यांनी या आर्थिक वर्षात बँकेचा व्यवसाय ११५० कोटींपेक्षा अधिकने वाढविल्याबद्दल त्यांना देखील बँकेच्या वतीने २०% बोनस जाहीर केला.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी बँकेच्या कामगिरीबाबत उपस्थितांना माहिती देताना बँकेने ३१ मार्च २०२३ अखेर रु४३२७ कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार करताना रु.२५७४ कोटींच्या ठेवी रु.१७५३ कोटींचे कर्जवाटप केले असल्याचे सांगितले. तसेच आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखत वैधानिक लेखापरीक्षणामध्ये अ ऑडीट वर्ग मिळविलेला आहे याबाबत आनंद व्यक्त केला. बँक सप्टेंबर २०२३ अखेर रु.५००० कोटींचा व्यवसाय टप्पा नक्कीच पूर्ण करेल असे सर्वांना आश्वासित केले. शिवाय बँकेच्या वतीने या आर्थिक वर्षात तब्बल ३००० पेक्षा अधिक नव्याने रिटेल कर्जप्रकरणांचे वाटप करून हा व्यवसाय या आर्थिक वर्षात १५० कोटींपेक्षा अधिक वाढविला आहे असेही उपस्थितांना सांगितले, तसेच बँकेने आपल्या नेट एनपीएचे प्रमाण दरवर्षीप्रमाणे शून्य टक्के राखत ढोबळ एनपीएचे प्रमाण सुद्धा १.२१ टक्क्यांनी कमी केले आहे असेही आपल्या मनोगतात मंदार वर्तक यांनी सांगितले.
सभेमध्ये इरशालवाडी येथील नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेले नागरिक, बँकेचे माजी उपाध्यक्ष कृष्णा गिदी, बँकेचे कर्मचारी यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करून विजयी कामगिरी करणार्‍या रायगड जिल्ह्यातील गुणवान खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. ज्यामध्ये तीनविरा अलिबाग येथील जपान येथे झालेल्या महिला ज्युनिअर आशिया करंडक हॉकीमध्ये सुवर्णपदक विजेत्या मनश्री नरेंद्र शेडगे, शेलू,कर्जत येथील अमृता ज्ञानेश्वर भगत जीने रुमानिया येथे संपन्न झालेल्या वर्ल्ड युथ पावरलिफ्टिंग मध्ये रौप्य पदक पटकाविले, तसेच अलिबाग तालुक्यातील शरीरसौष्ठवपटू संजय अनंत उले ज्याने नेपाळ येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकाविला आणि दिव्याक्षी छाया सुनील म्हात्रे- कणे पेण येथील खेळाडू जिने फिलिपाईन्स येथे पार पडलेल्या १४ व्या एशियन जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले अशा चार रायगड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा मानपत्र, शाल,श्रीफळ आणि ५१ हजार रुपये देवून सन्मान करण्यात आला.
बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी यावेळी सर्वांचे आभार मानत सभा संपन्न झाल्याचे जाहीर केले, सभेचे सूत्रसंचालन बँकेचे सिनियर मॅनेजर संदीप जगे यांनी केले.

बँकेचा स्वनिधी १००० कोटीपर्यंत नेणार .; पोलिस पाल्यास शैक्षणिक कर्जामध्ये २% सवलत; संस्था संगणकीकरणाच्या माध्यमातून शेती संस्था अधिक सक्षम करणार ;विविध कार्यकारी संस्थाच्या माध्यमातून पेट्रोल पंप उभारणार

बँकेचा स्वनिधी १००० कोटीपर्यंत नेणार .; पोलिस पाल्यास शैक्षणिक कर्जामध्ये २% सवलत; संस्था संगणकीकरणाच्या माध्यमातून शेती संस्था अधिक सक्षम करणार ;विविध कार्यकारी संस्थाच्या माध्यमातून पेट्रोल पंप उभारणार

बँकेचा स्वनिधी १००० कोटीपर्यंत नेणार .; पोलिस पाल्यास शैक्षणिक कर्जामध्ये २% सवलत; संस्था संगणकीकरणाच्या माध्यमातून शेती संस्था अधिक सक्षम करणार ;विविध कार्यकारी संस्थाच्या माध्यमातून पेट्रोल पंप उभारणारआमदार जयंत पाटील

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page