पनवेल, वार्ताहर
जेएनपीटी बंदरामधून होणाऱ्या आयात- निर्यातीच्या व्यवसायावर अनेक व्यवसाय येथील उरण, पनवेल भागामध्ये उभे राहिले आहेत. कस्टम सिएफएस आणि छोट्या-मोठ्या गोदामांचं मोठ्या प्रमाणात जाळ निर्माण झाले आहे. यातील पनवेल तालुक्यातील मुंबई, गोवा मार्गवरील वरील जडब्लूसी सिएफएस हे एक मेव सिएफएस आहे, की या सिएफएस च्या दर्शनी भागात सुंदर आणि मोठ्ठा गणराया विराजमान झाला आहे.
कामानिमित्त येणारा कंपनीचा स्टाफ, सीएचए, येणारा इतर घटक, कस्टम आधिकारी या गणराया चरणी नतमस्तक होत असतो. त्यात या जडब्लूसी सिएफएस तर्फे गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खुप सुंदर सजावट केली करून, रोज वेग वेगळ्या रांगोळ्या देखील काढल्या जातात. हाउत्सव दहा दिवस साजरा होतो. सकाळी मोठ्या भक्तीभावाने मनोभावे पूजा करून ढोल, टाळ, मृदंग वाजवत कंपनीच्या सर्व कर्मचारी आरती करतात. मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरे करणारे हे एकमेव सीएसएस ठरले असून, वर्षातील हे दहा दिवस बाप्पांच्या आगमनामुळे मंगलमय आणि प्रेरणादाई होऊन जातात. तर पुढील संपूर्ण वर्षभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते, अशा भावना येथील कर्मचारी व्यक्त करत आहेत.