उरण, वैशाली कडू
उरण तालुक्यातील सुप्रसिद्ध जागतिक कीर्तीचे समजले जाणाऱ्या घारापुरी बेटावरील लेण्यांना रशियन शिष्टमंडळाच्या १२ सदस्यांनी भेट देऊन पहाणी केली.

जागतिक कीर्तीच्या एलिफंटा लेण्यांची पहाणी करताना रशियन शिष्टमंडऴातील सर्वजण भारावून गेले होते. याप्रसंगी घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच बळीराम ठाकूर व सदस्य यांनी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांचे स्वागत केले. एलिफंटा बेटावर असलेल्या लेण्यांमधील शिवाच्या अनेक कलाकृती विविध रुपात पाषाणात कोरण्यात आली आहेत. या कलाकृती, लेण्यांची आणि बेटावरील विकासाची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर शिष्टमंडळाला दिली.

जगप्रसिद्ध घारापुरी बेट हे मुंबई पासून अवघ्या काही अंतरावर तर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात आहे. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या लेण्यांमध्ये शिवाच्या तीन भव्य मूर्ती पहायला मिळतात.
जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर रशियन शिष्टमंडळाने भेट दिली. त्यावेळी उपसरपंच बळीराम ठाकूर व सदस्यांनी या शिष्टमंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर बेटावरील लेण्यांचे दर्शन घेतल्यानंतर ते भारावून गेले. रशियन शिष्टमंडळाचे ग्रामपंचायतने केलेला यथोचित स्वागता बद्दल प्रशंसा केली.

