सहकारी संस्थामध्ये विश्वास निर्माण केल्याने आपला भरघोस मतांनी विजय- आ. जयंत पाटील

अलिबाग – अमुल कुमार जैन

पक्ष मतभेद बाजूला ठेवून अडचणीत असलेल्या सहकारी संस्थांना मदत केली आहे. सहकारी संस्थामध्ये विश्वास निर्माण केल्याने आपला भरघोस मतांनी विजय झाला असल्याचे रायगड जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अध्यक्ष पद निवडीनंतर झालेल्या सभेत केले.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. आ. जयंत पाटील यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सहाव्यांदा निवड झाली आहे. तर बँकेच्या उपाध्यक्ष पदी सुरेश खैरे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. बुधवारी (27 सप्टेंबर) चेंढरे येथील जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आगामी काळात जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थ्यांच्या बळकटी करणासाठी बँकेच्या माध्यमातून काम केले जाईल, अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिली. रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या 21 संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली होती. त्यात 18 संचालक हे बिनविरोध झाले होते. तर तीन संचालक पदांसाठी 16 सप्टेंबर रोजी मतदान होऊन 17 सप्टेंबर रोजी मतदमोजणी झाली. यात आमदार जयंत पाटील, प्रिता चाैलकर आणि मधुरा मलुष्टे यांचा विजय झाला होता. बुधवारी (27 सप्टेंबर) जिल्हा बँकेच्या चेंढरे येथील मध्यवर्ती कार्यालयात सकाळी 11 वाजता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात अध्यक्ष पदासाठी आमदार जयंत पाटील तर उपाध्यक्ष पदासाठी यांचा प्रत्येकी एक एक अर्ज आला. त्यामुळे अध्यक्ष पदी आमदार जयंत पाटील तर उपाध्यक्ष पदावर सुरेश खैरे यांची निवड जाहीर करण्यात आली.
1986 साली रायगड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर जयंत पाटील यांची निवड झाली होती. तर आता आमदार जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची सहाव्या वेळी अध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतली आहेत. उपाध्यक्षपदी निवड झालेले सुरेश खैरे 2007 मध्ये प्रथम बँकेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली होती. खैरे आजच्या निवडीमुळे चाैथ्यांदा उपाध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. सकाळी जिल्हा बँकेत झालेल्या अध्यक्ष – उपाध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेप्रसंगी माजी आमदार पंडित पाटील, बाळाराम पाटील, आस्वाद पाटील, जे.एम. म्हात्रे, रमेश नाईक, गिरीश तुळपुळे, प्रशांत नाईक, शंकरराव म्हात्रे, हनुमंत जगताप, अस्लम राऊत आदी उपस्थित होते. रायगड जिल्हा सरकारी बँकेच्या अध्यक्षपदाची पुुन्हा सुत्रे हाती घेताना आमदार जयंत पाटील यांनी बँकेच्या आगामी उद्दिष्टांबद्दल ऊपाहपोह केला. जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांना विविध व्यवसाय करता आले पाहिजे या दृष्टीने बँकेचे पुढील धोरण असणार आहे. सहकारी संस्था भक्कम पायावर उभ्या राहाव्या हे बँकेचे धोरण असेल. त्यांचा स्वनिधी एवढा तयार झाला पाहिजे की त्यांनी शेतकऱ्यांना लागणारे कर्ज वितरण केले पाहिजे. विविध सहकारी संस्थांना लागणाऱ्या सर्व सुविधा, प्रसंगी आर्थिक मदत, सबसिडी देण्याचा मनोदय नवीन संचालक मंडळांनी केला आहे, असे आ. जयंत पाटील म्हणाले. जिल्ह्यातील पेण अर्बन बँक, कर्नाळा बँक अशा अडचणीत आलेल्या संस्थांच्या पुनर्जीवनासाठी काय करता येऊ शकते, याबाबत बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले की, कर्नाळा अर्बन बँकेचे मालमत्तांचे मूल्य ठेवींपेक्षा भरपूर पटीने जास्त आहे. ती सर्व मालमत्ता शासनाने ताब्यात घेतली आहे. त्यामुळे सर्व ठेवीदारांचे पैसे लवकरच मिळू शकतात. यासाठी आपणही पुढाकार घेणार आहोत. पेण अर्बन बँकेचाही प्रश्न मार्गी लागू शकतो, अशा विश्वास आ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. मॉर्गेज चांगले घेतले तर कोणतीही संस्था अडचणी देऊ शकत नाही. मॉर्गेज परिपूर्ण असावे हेच जिल्हा बँकेचे गमक आहे. जिल्हा बँकेमध्ये कर्ज देताना दुप्पट पेक्षा जास्त मालमत्ता तारण घेतली जाते त्यामुळे जिल्हा बँकेत पुढे अडचणी येत नाहीत. जिल्हा बँकेने स्वनिधी वाढविला आहे. आपण बँक ताब्यात घेतल्यानंतर 35 कोटीवरून आज 5 हजार कोटीपर्यंत आणली आहे. त्याचा फायदा सभासद संस्थाना होऊन त्या आमच्याबरोबर आल्या पाहिजेत, त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत हे आमचे प्रयत्न आहेत, असे आमदार जयंत पाटील म्हणाले. जिल्ह्यातील कृषी बाजार समिती यांच्या सक्षमीकरणाबाबत जिल्हा बँकेचे काय नियोजन आहे. याबाबत आमदार जयंत पाटील म्हणाले की, जिल्हा बँक बाजार समिती यांना वेळोवेळी मदत करीत आली आहे. बाजार समित्यामध्ये आणखी आधुनिकता येण्याची आवश्यकता आहे. शेतीमालाचे पिकाचे नुकसान होऊ नये त्याची काळजी कशी घ्यावी याचा अभ्यास सुरू आहे. कृषी व सहकार खात्याकडे याचे मार्गदर्शन मागतोय. त्यांना कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे जेणे करून शेतमालाचे नुकसान थांबेल. जिल्हा शिखर बँक म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक सहकारी संस्था तिची जबाबदारी आमची आहे असे आमदार जयंत पाटील म्हणाले. जिल्ह्यातील सहकारी संस्थांना सक्षमीकरणासाठी गोडाऊन निर्माण करून अद्यावत कार्यालय सुरू करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. यामार्फत मायक्रो फायनान्स व इतर व्यवसाय सुविधा दिल्या जाणार आहेत. यावेळी सूत्रसंचालन संदीप जगे यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page