उरण, विरेश मोडखरकर
स्वच्छता ही सेवा अभियानातून घारापुरीचे किनारे स्वच्छ
घारापुरी बेटावर “स्वछ भारत” अभियानाअंतर्गत “स्वच्छता ही सेवा” हे अभियान राबविण्यात आले. यावेळी बंदरालगतचा समुद्रकीनारा आणि येथील परिसर स्वछ करण्यात आला. तर कचरामुक्त भारत हा नाराज देखील यावेळी देण्यात आला.
पर्यटकाना स्वछ परिसर अनुभवता येणार
घारापुरी बंदर येथील पाषाणात कोरलेल्या शैव लेण्यामुळे जगप्रसिद्ध आहेत. यामुळे येथे स्वदेशी तसेच परदेशी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. दररोज हजारो पर्यंटक या बंदराला भेट देत असतात. यामुळे घारापुरी बंदर हे, रायगड, नवी मुंबई आणि मुंबईसाठी महत्वाचे पर्यटन स्थळ झाले आहे. ग्रामपंचायातच्या माध्यमातून येथील गावांचा व्यवहार पाहिला जातो तर येथील लेणी भारतीय पुरातत्व खात्याकडे असून, संपूर्ण बंदराच्या पर्यटन विकासाची जवबदारी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची आहे. आज या बंदरावर भारतपर्यटन, महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळ,भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग आणि ग्रामपंचायत घारापुरी यांचे संयुक्त विद्यमाने “स्वछ भारत” अभियानाअंतर्गत “स्वच्छ ही सेवा” अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानातून येथील किनारे आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. यामुळे येथील परिसर कचरामुक्त झाला आहे. तर येणाऱ्या पर्यटकांना येथील स्वछ परिसर सुद्धा अनुभवायला मिळणार आहे.
अशाप्रकारचे उपक्रम यापुढे देखील राबवणार
ग्रामपांचायात घारापुरी नेहमीच समाजापयोगी उपक्रम राबवून येथील नागरिकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. यातूनच पर्यटकांना देखील सेवा मिळावी या हेतूने प्रयत्न केले जातं आहेत. तर “स्वच्छता ही सेवा” अशा अभियानातून येथील स्वच्छता होणार असल्याने, आता येथील पर्यटन देखील सुंदर आणि देखणे होणार आहे. तर भारतपर्यटन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ,भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग यांचाही या अभियानामध्ये समावेश असल्याने, हे अभियान यशस्वी होण्यासाठी अधिकच मदत झाली आहे. तर अशाच प्रकारे पुढेही उपक्रम राबविण्यात येणार असून, येथील पर्यटकांना स्वछ घारापुरी पहायला मिळणार आहे.
बातमी आवडली असल्यास जरूर लाईक, शेअर आणि कमेंट्स करा.