
मुंबईतील लालबागचा राजाच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून भक्त येत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी आणि व्यक्तींनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले व बप्पाच्या चरणी लीन झाले.लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर महेंद्रशेठ घरत हे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले आणि सिद्धिविनायकाचे मनोभावाने दर्शन घेतले.
