उरण, प्रतिनिधी
हुतातमा नाग्या कातकरी यांच्या स्मृती दिनाचे अवचित्य साधून कार्यक्रम साजरा
उरण तालुका केमिस्ट असो तर्फे फार्मसिस्ट डे साजरा केला जातो. या वर्षी “फार्मसिस्ट डे” आक्का देवी आदिवासी वाडी येथे साजरा करण्यात आला. हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या स्मृतिदिनाचं अवचित्य साधून कार्यक्रमाचे ठिकाण ठरवण्यात आले होते. कार्यक्रमासाठी जवळपास एक हजार आदिवासी बांधव उपस्थित असून, या आदिवासी बांधवांना उरण तालुका केमिस्ट असो तर्फे औषधे घेण्याविषयी माहिती देण्यात आली, तसेच त्यांना कृमिनाशक गोळ्या वाटप करण्यात आल्या

२५ सप्टेंबर हा दिवस “फर्मासिस्ट डे ” म्हणून साजरा करण्यात येतो. तर याच दिवशी ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतातम्यांना मानवंदना देण्यात येते. याच सत्याग्रहातील हुतात्मा नाग्या कातकरी यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात “वनवासी कल्याण आश्रम” यांच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो. हा कार्यक्रम अक्कदेवी आदिवासी वाडी येथील हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या पुतळ्याजवळ करण्यात येतो. तर या वेळी हजारो आदिवासी बांधव कार्यक्रमास हजेरी लावतात. या कार्यक्रमाचे अवचित्य साधून उरणमधील “उरण तालुका केमिस्ट असोसिशन” तर्फे “फार्मासिस्ट डे” अक्कदेवी वाडी येथे साजरा केला. यावेळी उपस्थित बांधवाना कोणतेही औषध घ्यायचे असल्यास, औषधे घेण्याचे नियम आणि पद्धत सांगण्यात आली. तर उपस्थित बांधवाना कृमीनाशकांचे वाटप करण्यात आले. यावेळी या समाज बांधवांच्या आरोग्यासाठी संघटनेकडून वैद्यकीय तपासांणी शिबिराचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. या प्रसंगी रायगड जिल्हापदाधिकारी तसेच वनवासी कल्याण आश्रमचे आध्यक्ष मनोज ठाकूर, उरण तालुका केमिस्ट असो अध्यक्ष उमाकांत पानसरे, सचिव राजेश्वर गावंड, बाळू घालवत आणि अभिनय पाटील उपस्थित होते.

