प्रतिनिधी, विरेश मोडखरकर
वनवासी कल्याण आश्रम व हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मारक समितीच्यावतीने अक्कादेवीच्या माळरानावर अभिवादन कार्यक्रम पार पडला. 25 सप्टेंबर 1998 साली वनवासी कल्याण आश्रमाच्या 19 कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष माळरानावर कार्यक्रम सूरू केला होता. 2018 रोजी हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मारक समिती स्थापन करून, माळरानावर नाग्या दादा चा पुतळा उभा केला आहे.
देश स्वातंत्र्यासाठी अनेक आंदोलनेकरण्यात आली होती. यातीलच एका आंदोलन म्हणजे महात्मा गांधी यांनी पुकारलेलं असहकार आंदोलन. या आंदोलनादरम्यान मिठाचा कायदा तोडण्यात आला होता. याचाच एक भाग म्हणून चिरनेर जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. या आंदोलनामध्ये जुलमी ब्रिटिश सरकारने केलेल्या गोळीबारामध्ये नऊ जणांना वीर मरण आले होते. यातील हुतातमा नाग्या कातकरी यांना चिरनेर अक्कदेवी वाडीवर मानवंदना देण्यात आली. यावेळी आदिवासी समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच येथील नागरिकांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी येथील आमदार महेश बालदी यांनी अपल्या कार्यकर्त्यांसमवेत हुतातमा नाग्या कातकरी यांना श्रद्धांजली अर्पण करून, या भागातील विकासासाठी कायम कटिबध्द राहणारअसल्याचे कार्यक्रमाप्रसंगी म्हटले आहे. तर जनजाती कातकरी विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते व सारसन ग्रामस्थ यांनी मशाल मिरवणूक आणली आणून मानवंदना दिली. तर भगवान नाईक यांनी समाज आपल्या विकासासाठी एकजूट झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. वनवासी कल्याण आश्रमाचे क्षेत्र हितरक्षा सहप्रमुख युवराज लांडे यांनी शिका कौशल्य प्राप्त करा. आपल्यामध्ये असलेले गुण विकसित करून, शासकिय नोकऱ्या मिळावा. पूर्वजांचे स्मरण करून आपली संस्कृती परंपरा जपली पाहिजे व अन्य धर्मियांपासुन सुरक्षित राहिलं पाहिजे कारण आपला इतिहास महान असल्याचे म्हटले आहे.