पनवेल, किरण बाथम
गांधी जयंती सप्ताह निमित्ताने भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्यावतीने पनवेलच्या हजरत पीर करम अली शाह दर्गावर स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवण्यात आला.
भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर आणि प्रदेश सचिव बबलू सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पनवेल महानगर पालिका उद्यानातील महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दर्गावर चादर अर्पण करून दुवा मागण्यात आली. या प्रसंगी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त झालेल्या मन्सूर पटेल यांचा सय्यद अकबर यांच्याहस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय पातळीवर स्वच्छता अभियान संकल्पना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. या राष्ट्रीय अभियानामध्ये मुस्लिम समाज देखील मनःपूर्वक सहभागी झाला आहे. मोदींच्या देशासाठीच्या विकासाच्या प्रक्रियेत मुस्लिम स्त्री-पुरुष यांचा देखील सकारात्मक प्रतिसाद आता लाभत आहे. अल्पसंख्यांक मोर्चाच्या माध्यमातून घर-घर भाजप संपर्क आमचे पदाधिकारी करत आहेत. मन्सूर पटेल यांच्या सारख्या उमद्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती मिळाल्याने सर्वांनाच आनंद झाला असल्याचे मत सय्यद अकबर यांनी मांडले. सत्काराला भारावलेल्या मन्सूर पटेल यांनी समयोचीत विचार मांडले.
त्यानंतर उपस्थित सर्वांनी प्रत्यक्ष सफाई अभियान निमित्त केरसुणी ने सफाई केली.यावेळी सय्यद अकबर, बबलू सय्यद यांच्या सह मन्सूर पटेल, ऍड. इर्शाद शेख, नासिर शेख, मोहसीन कर्नाळकर, तौफिक खांडे, ऍड. मेहबूब पटेल, नूर मुजावर, नविद पटेल, गफूर सय्यद आदीसह अनेक भाजप कार्यकर्ते तसेच जरीना शेख व मुस्लिम महिला कार्यकर्ते उपस्थित होते.