उरण, विरेश मोडखरकर
कोल्हापूर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये उरणच्या किशोर पाटील आणि हितेश भोईर यांनी चार गोल्ड, एक सिल्व्हर आणि दोन ब्रॉन्झ मेडलची कामाई केली असून, सांघिक रिले स्पर्धेमध्ये एक गोल्ड आणि एक सिल्व्हर मेडल मिळवून स्पर्धेमधील आपली चमक दाखवून दिली आहे.
महाराष्ट्र स्टेट वेट्रन्स ऍक्वाटिक स्वीमिंग असोसिशन यांच्या माध्यमातून, कोल्हापूर येथील सागर पाटील जलतरण तलाव येथे मास्टर्स जलतरण संपर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये राज्यातून संपर्धकांनी सहभाग घेत आपले जलतरणामधील कसब दाखवले. या वेळी उरण तालुक्यातून किशोर केशव पाटील आणि हितेश जगन्नाथ भोईर या दोन स्पर्धाकांनी उत्कृष्ट स्पर्धा करत स्पर्धेवर आपली छाप सोडली आहे. किशोर पाटील हे खारघर, नवी मुंबई येथील जलतरण तालाव येथे प्रशिक्षक आहेत. तर हितेश भोईर हे उरण नगर परिषदेच्या जलतरण तलाव येथे प्रशिक्षक आहेत. जलतरण पटू घडवत असताना आपण स्वतः देखील तितकेच तरबेज असल्याचे त्यांनी या स्पर्धेमध्ये मिळवलेल्या यशानंतर सिद्ध केले आहे. किशीर पाटील यांनी २०० मी. फ्रिस्टाईल, ४०० मी फ्रिस्टाईल, आणि २०० मी. आयएम या तीन स्पर्धेमधून तीन गोल्ड मेडल तर ५० मी. बटरफ्लाय स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवले असून, सांघिक रिले स्पर्धेमध्ये सिल्व्हरं मेडलची कामाई केली आहे. तर हितेश भोईर याने १०० मी. फ्रिस्टाईल गोल्ड, ५० मी. बटरफ्लाय सिल्व्हर आणि २०० मी. आयएम या स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडलची कामाई केली असून, सांघिक रिले स्पर्धेमध्ये गोल्ड मेडलची कामाई केली आहे. यामुळे या दोन स्पर्धाकानी उरण तालुक्यासाठी एकूण पाच गोल्ड, दोन सिल्व्हर आणि दोन ब्रॉन्झ मेडल मिळवून दिले आहे. या दोनही स्पर्धाकांचे जिल्हाभरातून कौतुक केले जात असून, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.