अलिबाग, प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कुरुळ गावा लगत खाडी असुन आम्ही महिला मागील ६० वर्षा हुन अधिक काळ या खाडीतुन शिवल्या कालवे मच्छीमारी यांचे उत्पादन आहोत. मात्र या खाडीत गेल्या काही दिवसांपासून कोकण बार्ज नामक कंपनी अनधिकृत कामे करीत आहे. याबाबत कुरुळ येथील महिला वर्गानी कोकण बार्ज कंपनी विरोधात अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांना निवेदन सादर केले आहे.
कुरुळ खाडीतुन मिळणा-या उत्पनावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कोरोना काळात देखील संपुर्ण व्यवहार बंद असताना सुध्दा खाडीतील शिवल्या व कालवे या पासुन मिळालेल्या उत्पन्नावर आम्ही उदरनिर्वाह करु शकलो.
या खाडी लगत कोकणबार्ज प्रा.लि. हि जहाज बांधणीची कंपनी आहे. या कंपनीमध्ये मोठी जहाजे बनतात सध्या कंपनी खाडीच्या क्षमतेपेक्षा मोठी जहाजे खाडीतुन आण आहेत. कंपनीने ग्रामस्थांना विश्वासास न घेता अवैध रित्या खाडीमध्ये मँग्रोज ची मोठी प्रमाणात तोड कुरुळ खाडीतील सुमारे १५०० ब्रास वाळू मिश्रीत रेती चे उत्खनन केल्याचे ग्रामस्थांना निदर्शनास आले. या वाळु मिश्रीत रेती मध्येच तिस-या व कालवे यांचे नैसर्गिक रित्या उत्पादन होते. जर असेच अवैध रित्या उत्खनन चालु राहिले तर कुरुळ गावातील व परिसरातील सुमारे २०० हुन अधिक कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल जर यावर काही कारवाई झाली नाही तर आम्ही महिला आपल्या कार्यालया समारे उपोषणास बसु तसेच कोणताही अनुसुचित प्रकार घडला तर कायदा व व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी हि प्रशासनाची असेल तरी या अर्जाचा आपण जाणीव पुर्वक विचार करावा व आम्हा महिलांना योग्य तो न्याय दयावा अशी विनंती महिला वर्गाकडून करण्यात आली आहे