शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी म्हणून आज प्रत्येक क्षेत्रा सोबतच प्रत्येक माध्यम सुद्धा उपयुक्त ठरतं आहे. असचं एक माध्यम सोशल मीडिया आणि इंटरनेटच झालंय विविध प्रकारच्या मिहितिची देवाण – घेवाण करण्याकरिता तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थीवर्ग शिक्षण घेत असतात, आणि याच नवं तंत्रज्ञानाची जोड मिळून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं म्हणून अनेक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता मदतीचा हात पुढे करणारं व्यक्तिमत्व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक, महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून रा.जि. प. शाळा पाले उरण या शाळेला एक नवीन स्मार्ट टिव्ही संच भेट देण्यात आला. ज्या मुळे त्या शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकी अभ्यासासोबत इंटरनेटच्या द्वारे मनोरंजनातून विविध प्रकारच्या ज्ञानवर्धक गोष्टींची माहिती टिव्हीच्या माध्यमातून अभ्यासाच्या रूपाने प्रत्यक्ष पाहता येतील. त्यातून अनेक नवं – नवीन गोष्टी शिकता येतील. त्याचसोबत शाळेतील विद्यार्थ्याना वर्गात बसण्या करिता चार सतरंजी ( चटई ) सुध्दा भेट देण्यात आल्या आहेत.
Post Views:73
Please Share
One thought on “रा.जि.प. शाळा पाले येथे भेट देण्यात आला स्मार्ट टिव्ही संच !”
खूप छान, आदिवासी साठी मुंबईकर सर देवदूत आहेत.