उरण, वार्ताहर
माजी आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची बैठक

जेएनपीए उपाध्यक्ष सन्माननिय उन्मेश वाघ यांच्या सोबत नवीन शेवा गावातील प्रलंबित प्रश्नांवर शुक्रवार दिनांक ०६ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली बैठक संपन्न झाली माजी आमदार जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवीन शेवा गावाच्या पुनर्वसनाचे जटील प्रश्न, वाढीव गावठाण, नोकऱ्या व नागरी सुविधा बाबत असे विविध समस्या सोडवण्यासाठी बैठकित चर्चा करण्यात आली.
बैठकीमध्ये पाण्याच्या बीलाचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे, शेवा गावाचे पुनर्वसन करताना पाण्याचे बील जेएनपीटी भरत होती परंतु आता हे बील जेएनपीटी ने भरत नाही, या मुद्यावर जेएनपीटी चे उपाध्यक्ष वाघ यांनी सांगितले की, पाण्याच्या बिलाबाबत आम्ही तत्वता मान्यता देतो, पण जेएनपीटी कडून नवीन शेवा गावाला टॅक्स मिळेल त्यावेळी हे पैसे आम्ही कापून घेऊ, तसेच हा मुद्दा आम्ही बोर्ड मीटिंगमध्ये घेऊन याच्यावर चर्चा करून निर्णय देऊ, तसेच जेएनपीटी ने ३३ : ६४ : ०५ हेक्टर जमीनीचे पैसे सिडकोला नवीन शेवा गावाच्या पुनर्वसनासाठी दिले होते, याबाबत सिडको बरोबर बैठक लावून हा प्रश्न सोडवला जाईल असे मान्य केले, जेएनपीटीने 36 वर्षांपूर्वी नवीन शेवा गावचे पुनर्वसन केले होते त्या वेळी रस्ते, गटारे ची कामे केली होती, परंतु आता इतक्या वर्षानंतर रस्ते व गटारांची व इतर नागरी सुविधांची कामे जेएनपीटी केली नव्हती, त्यासाठी जेएनपीटी कडून दहा कोटी रुपये हे रस्ते, गटारे व नागरी सुविधांसाठी देण्याचे त्यांनी मान्य केले, त्याचबरोबर पुनर्वशीत नवीन शेवा गावातील तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले आहे तसेच नवीन शेवा ग्रामपंचायतीला कुठलाही उत्पन्न नसल्यामुळे साफसफाईसाठी चार कामगार देण्याचे त्यांनी मान्य केले आहे, या सर्व प्रश्नांवर जेएनपीटी ने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मनोहरशेठ भोईर यांनी उपाध्यक्ष उन्मेश वाघ यांचे आभार मानले आहेत. सदर बैठकीला जेएनपीटी च्या जनरल मॅनेजर सौ मनीषा जाधव, डेप्युटी जनरल मॅनेजर पगारे, इस्टेट ऑफिसर कनवाळू तर नवीन शेवा गावच्या शिष्टमंडळात नवीन शेवा गावच्या सरपंच सौ सोनल घरत, गावचे अध्यक्ष कमळाकर पाटील, उपसरपंच कुंदन भोईर, ग्रामपंचायत सदस्य भूपेंद्र पाटील, सौ मयुरी घरत,सौ वैशाली म्हात्रे, सौ भावना भोईर, सौ रेखा म्हात्रे तसेच प्रमुख कार्यकर्ते महेश म्हात्रे व निलेश घरत या बैठकीस उपस्थित होते.