रस्त्यासाठी महिलांचे धरणे आंदोलन

उरण, विरेश मोडखरकर

उरण, पनवेल हा राज्य मार्ग मागील तीन वर्षांपासुन दुरुस्तीच्या कारणाने बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गवरील पूल कमकुवत झाला असल्याने, पूल दुरुस्तीचं कारण देऊन मार्ग बंद ठेवण्यात आला असल्याने, येथील तीन गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. तर येथील विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाला नाहक चार की. मी. वळसा मारून जावे लागत आहे. प्रवासासाठी अधिक भार देखील सहन करावा लागत आहे. तीन वर्षे उलटूनही मार्ग मोकळा होत नसल्याने आता अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने सिडाको प्रशासनाविरोधात धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

बातमी पाहण्यासाठी ☝️☝️☝️क्लिक करा….

सिडकोच्या माध्यमातून उरण तालुक्यातील जागा संपदीत करून तिसरी मुंबई स्थापन कारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मागील चाळीस वर्षांपूर्वी येथील रस्ते, नाले, नाल्यांवरील मोरया, पूल यासारख्या आवश्यक गोष्टी तयार करण्यात आल्या होत्या. मात्र चाळीस वर्षे उलतून गेल्यानंतर आता केलेली ही कामे कमकुवत झाली आहेत. अशाच प्रकारे उरण, पनवेल राज्य मार्ग ५४ वरील फुंडे गावाजवळील खाडिवरील पूल कमकुवत झाला असल्याचे कारण देत हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यामुळे येथील फुंडे, बोकडवीरा आणि डोंगरी गावाचा राज्य मार्ग ५४ शी संपर्क तुटला आहे. तर येथून येणारी एसटी बस आणि एनएमएमटी देखील बंद झाल्याने, मागील तीन वर्षापासुन येथील नागरिकांना प्रवाससाठी अधिक वेळ आणि पैसे मोजावे लागत आहेत. उरणहून किंवा उरणसाठी या मार्गवरून प्रवास करणाऱ्यांना नाहक चार की. मी. वळसा मारून जावे लागत असून, यासाठी आधी भाडे आकारणी द्यावी लागत आहे. अनेक तक्रार अर्ज, अनेक भेटीगाठी, अनेकदा सिडको कार्यालयाला घेराव घालूनसुद्धा हा मार्गा सुरु करण्यासाठी सिडको प्रशासन चालढकल करत आहे. यामुळे “अखिल भारतीय जनवादी महिला संघटना” यांच्या माध्यमातून धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. जोपर्यंत हा पूल दुरुस्त करून, मार्ग मोकळा केला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या आंदोलनाला ग्रामस्थ, नागरिक, प्रवाशी वर्ग यांनी देखील पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page