उरण, वैशाली कडू
नवरात्रोत्सवाला रविवार दि. १५ ऑक्टोबर पासून उत्साहात सुरुवात होणार आहे, या उत्सवादरम्यान अनेक ठिकाणी देवींच्या मुखवटय़ांचे पूजन करून त्यांचे दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे. या मुखवटय़ासाठी नारळाच्या शहाळ्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे शहाळ्यापासून देवीचा मुखवटा तयार करण्याची कला उरणच्या नागाव येथील गजानन नाईक कुटुंबीयांनी जपली आहे.
काही माणसे असतात धेय्य वेडी असेच एक व्यक्तीमत्व म्हणजे नागाव गावचे सुपूत्र श्री गजानन विठ्ठल नाईक वय ८० गेले सहा दशकं गावातील कुटूंबीयांना , तसेच गावकऱ्यांना नवरात्रीमध्ये मुखवटे तरार करुन देण्यात त्यांना अतीशय आनंद मिळतो असे त्यांनी सांगितले. गजानन नाईक हे स्वतः आपल्या वाडीतले नारळाच्या झाडावरचे नारळ काढून ते आपल्या कलेने देवीचा मुखवटा रेखाटून रंग भरणार तसेच स्वतः घटस्थापना करतांना देवी सजविण्यासाठी देखील जे बोलावतील त्यांच्या कडे जाऊन देवी सजवतात. हे सर्व नि:शूल्क असे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व आहे. ते जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या शिक्षिका सौ. प्रमिला पवार मॅडम यांचे वडील आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष पवार यांचे सासरे आहेत. श्री गजानन विठ्ठल नाईक यांना सर्व आदराने बंधू असे संबोधतात.