अलिबाग, अमूलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जप्त करण्यात आलेले कार्यालयाचे लॉक तोडून अतिक्रमण करीत दिले भाड्याने दिले असल्याने रामस्वरुप बिरबल यादव (वय 34 वर्षे असिस्टंट डायरेक्टर डायरेक्टर ऑफ इनफोर्समेंट मुंबई,रा.केसर ए हिंद 4 था मजला ,करीमभाय रोड.बलार्ड ईस्टेट मुंबई) यांनी नितेश ठाकूर व धीरज जोशी यांच्या विरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,अलिबाग नगरपालिका हद्दीतील मौजे ब्राह्मण आळी येथे असणाऱ्या सृष्टी सांरग को ऑप सोसायटी येथील कमर्शिअल शॉप नं 4,6,7,8,9, रामस्वरूप बिरबल यादव यांच्या डायरेक्टर ऑफ इनफोर्समेंट मुंबई या कार्यालयामार्फत जप्त करण्यात आलेले व डायरेक्टर ऑफ इनफोर्समेंट मुंबई या कार्यालयाच्या ताब्यात असलेले सृष्टी सांरग को ऑप सोसायटी अलिबाग जि रायगड येथील कमर्शिअल शॉप नं 4,6,7,8,9 हे आरोपीत क्रमांक धीरज जोशी याने फिर्यादी यांच्या कार्यालयाची परवानगी न घेता विनापरवाना शॉपचे लॉक तोडुन अतिक्रमण करुन शॉप नं 4 मध्ये रिअल इॅस्टेट ब्रोकरचे ऑफीस उघडुन आरोपीत नितेश ठाकूर याचे सांगणेवरुन आरोपी नं.02 याने शॉप नं 6,7,8,9 हे दरमहा 40,000/-रुपये भाडयाने डिफेन्स अॅकेडमी साठी दिले.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गु.र.नं.256/2023 भा.दं.वि.क.447,34, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्राची पांगे हे करीत आहेत.