अलिबाग, अमूलकुमार जैन
भारताचे माजी राष्ट्रपती स्व.डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतीक मंच व प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका ग्रंथालय-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या को. म. सा. प. अलिबागच्या उपाध्यक्षा श्रीमती निर्मला फुलगावकर यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ९२ व्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
.

देशाचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्म १५ आक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथील धनुषकोडी येथे झाला होता.”मिसाईल मँन” म्हणून त्यांची ओळख होती.
यावेळी पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी मंचाचे अध्यक्ष सखाराम अण्णा पवार, मंचाचे कार्यवाह नागेश कुळकर्णी,माजी नगरसेवक आर.के.घरत,कोमसापचे सहकार्यवाह नंदु तळकर, जेष्ठ साहित्यीक तसेच नाट्यकर्मी तथा मंचाचे उपाध्यक्ष शरद कोरडे, जेष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा चारुशीला कोरडे,जनसेवा पतसंस्थेचे उपाध्यक्ष मुश्ताकभाई घट्टे, सामाजिक कार्यकर्ते सतीश लोंढे,माजी मुख्याध्यापक पुरुषोत्तम साठ्ये, साहित्यिक ऋती बोंद्रे, श्रीमती संध्या कुलकर्णी, अँड.राजेंद्र जैन, मुरुड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अमुलकुमार जैन, पोलीस पाटील संघटनेचे सरचिटणीस विकास पाटील, पत्रकार प्रमोद जाधव,जिल्हा रुग्णालयाचे हेमकांत सोनार ,समंत संतोष बोंद्रे,झेबा कुरेशी आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश कुळकर्णी यांनी केले. कोमसापचे नंदु तळकर यांनी पुस्तक वाचक दिनानिमित्त वाचनामुळे अज्ञानाचा अंधार नाहिसा होवून विचारांची दिशा मिळते. वाचनामुळे मनावर उत्तम संस्कार होतात असे प्रतिपादन केले.पण अलिकडच्या काळात मोबाईल व टि.व्ही च्या भोवती मानवी जीवन केंद्रीत झाले असल्याने वाचन संस्कृती नाहिशी होत असल्याची खंत व्यक्त केली. याप्रसंगी डॉ .एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले. सार्वजनिक वाचनालय अलिबाग येथे वयाच्या पाचव्या वर्षापासून सतत विविध प्रकारच्या पुस्तकाचे वाचन संस्कृती जतन करत असल्याबद्दल तसेच अशीच प्रेरणा इतर मुलांची सुध्दा घ्यावी हा उद्देश समोर ठेवून समंत संतोष बोंद्रे याचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ तसेच पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले.वाचन संस्कृती विषयी पोलीस पाटील संघटनेचे सरचिटणीस विकास पाटील यांनी माहिती यावेळी सांगितली.