उरण, अजय शिवकर
आजच्या देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी
ब्रम्हचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते.ब्रम्हचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे , “आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे,आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण ज्योती स्वरूप आहे” या सजगतेसह जीवन जगत असाल तेंव्हा तुम्ही ब्रम्हचर्यात असता.
जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल.जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल-हे ब्रम्हचर्य होय.
आपण देवीच्या या रुपाची आराधना करतो तेंव्हा आपल्या मध्ये ब्रम्हचर्याचे गुण जागृत होऊ लागतात.आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते,जो आपला मूळ स्वभाव आहे.आणि जेंव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेंव्हाच आपण शूर,निडर,पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो.
मोरा गावची एकविरा ( संजीवनी )
चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात जे बंदर वसले ते मोरा बंदर असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. येथील डोंगरावर आदि-काळापासुन लेण्यांमध्ये देवीचे मूर्तीरुपी स्थान आहे. काळ्या दगडामध्ये कोरलेल्या एका गुफेमध्ये हे स्थानं आहे. मोरा फड नंबर पाच येथे असणाऱ्या या गुफेच खरं नाव आदी पुरुषाची गुफा असून, सध्या हे स्थान एकविरा मातेच मंदिर म्हणून प्रसिद्धीस आहे.
डोंगर व मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात पाषाणावर हातांचे व पावलांचे ठसे आजही पाहायला मिळतात. तसेच गुफेच्या उजव्या बाजूला पाण्याचा हौद देखील आहे. देवीमुळेच नव-जिवण मिळते असाविश्वास येथे येणार्या भाविकांचा आहे, म्हणून ही संजीवनीदेवी ! पण स्थानिक कोळी लोक तिला आपली कोल्यांची पाठीराखी आई एकविरा म्हणतात. याठीकाणी हिंदू संस्कृतिमध्ये होणारे प्रत्येक सण साजरे केले जातात. तर नौरात्रीला नऊ दिवस भक्तांची गर्दी येथे पहायला मिळते. कुणी अध्यात्मिक शांती, कुणी नवस बोलायला, तर कुणी नवस फेडायला येथे येत असतात. येथे आल्यावर येथील गुफा, देवींची मूर्त आणि येथील परिसर पाहून नक्कीच काही काळ शांत बसावंसं वाटतं. ज्यामुळे एक नवी ऊर्जा प्रत्येकाला मिळत असते, असं येथे येणार्या भाविकांचं म्हणणं आहे.
उद्या मंगळवार
१७/१०/२०२३
उद्याच्या देवीचे तिसरे रूप — चंद्रघंटा
उद्याच्या देवीची माहिती — करंजाची द्रोणागिरी माता
उरणमधल्या “नवशक्ती” आवश्यक वाचा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका.