पिरवाडीची मांगीनी देवी
उरण, अजय शिवकर
आजच्या देवीचे चौथे रूप,'कूष्माण्डा'
कुष्मांड म्हणजे कोहळा. या कोहळ्यात खूप बिया असतात, आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. हे पुनरुत्पादनाचे,निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे. हे विश्वच कोहळ्याप्रमाणे असते.
आजची उरणची शक्ती आहे
पिरवाडीची ‘मांगीनी देवी‘
द्रोणागिरीच्या पर्वताच्या पश्चिमेकडे समुद्र किनाऱ्यावरील पिरवाडी येथे काही लोकांची वसाहत होती. आबाजी घरत यांच्या घरापासून जरा दुर खूप जिर्ण असे सुकलेले वटवृक्ष मधोमध चिरून आतुन पाषाणाची मूर्ती बाहेर आली. रहिवासी व काही सहकारी मिळून आबाजींनी तिची तेथेच स्थापना केली. ही देवी भक्तांच्या मागण्या पुऱ्या करते या भावनेने देवीच नाव मांगीनी देवी पडले असावं. आपल्या इच्छापूर्तीसाठी भाविक येथे नवस बोलतात, नंतर इच्छापूर्ती झाली की नवस फेडण्यासाठी कुटुंब, मित्रपरिवारासह येतात.
उद्या गुरुवार
१९/१०/२०२०
उद्याच्या देवीचे पाचवेरूप — स्कंदमाता
उद्या उरणच्या पाचव्या देवीची माहिती —
नवीन शेवा ची ‘शांतेश्वरी देवी‘
माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.