कर्जत, गणेश पुरवंत
नेरळ येथे शिवसेना शिंदे गट महिला आघाडीकडून महिलांसाठी खास नवरात्रीचे अवचीत्य साधून, भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. आईलम्मा पैलम्मा, एक लिंबू झेलू बाई म्हणत शेकडो महिलांनी या भोंडल्यात ताल धरला.
अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला नवरात्रौत्सवाला सुरूवात होते. हस्त नक्षत्राला सुरूवात झाली की भोंडल्याला सुरूवात होते. पाटावर तांदूळ अथवा इतर धान्याचा वापर करून हत्तीचे चित्र काढण्यात येते. त्याशेजारी फुलांची आणि रांगोळीची सजावट केली जाते. हस्त नक्षत्राचं प्रतिक म्हणून हत्तीची पुजा केली जाते आणि त्याभोवती फेर धरून निरनिराळी मराठी लोकगीत गाणी गायली जातात. त्यामुळे ही परंपरा जपली जावी याकरिता नेरळ येथे अंबेमाता सभागृहात शिवसेना शिंदे गट नेरळ शहर महिला संघटीका जान्हवी साळुंके यांच्या संकल्पनेतून व आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून खास महिलांसाठी या भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेत फेर धरत, झिम्मा फुगड्या देखील घातल्या. तर या कार्यक्रमात 300 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात महिलांसाठी साड्या व लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आला होता. यामध्ये तीन महिला विजेत्या ठरल्या असून प्रसाद थोरवे यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून त्यांना देण्यात आले त्यावेळी अवणी नागो पारधी यांनी माक्रो वेवओव्हन, काजल गुप्ता यांनी टिव्ही तर जागृती ठमके यांनी फ्रीज जिंकला.
कार्यक्रमाला पंचायत समितीच्या माजी सदस्या मीना थोरवे, महिला जिल्हा सल्लागार सुरेखा शितोळे, रेश्मा म्हात्रे, छाया पाटील, मनीषा थोरवे,मनीषा भासे, शहर संघटिका कर्जत भारती शिंदे, नेरळ शहर संघटिका महिला आघाडी जान्हवी साळुंके, नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी, सदस्य गीतांजली देशमुख, उमा खडे, जयश्री मानकामे, श्रद्धा कराळे, धर्मानंद गायकवाड, शहरप्रमुख प्रभाकर देशमुख, वर्षा बोराडे, मनोज मानकामे, अंकुश दाभने, किसन शिंदे, सुरेश राणे, आबासाहेब पवार, विवेक दहिवलिकर, अश्विनी पारधी, भाजप कर्जत तालुका महिला मोर्चा अध्यक्षा नम्रता कांदळगावकर आदींसह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. तर या सबंध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप घुले यांनी केले.