नवरात्र विशेष : उरणच्या नवशक्ती

उरण, अजय शिवकर

आजच्या देवीचे सहावे रूप ‘कात्यायनी

देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे. जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत. कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. हि देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतिक आहे.

आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय.

आजची उरणची सहावी शक्ती जसखार ची ‘रत्नेश्वरी देवी

शेवा गावच्या जवळच असलेल्या जसखार या गावात रत्न सापडावे तशी तळ्याच्या पाण्यात एका भाविकाला ही पाषाण रूपी मूर्ती सापडली, ती रत्नेश्वरी देवी. जे.एन पी.टी प्रकल्पात अनेक गाव उठवून स्थलांतर करण्यात आली. त्याच्यात जसखार हे गाव देखील होत. १९८४ ला भराव होऊन गावाने स्थान सोडल पण देवीचे स्थान कायम तेथेच आहे. आता नवीन गावात तालुक्यातील सर्वात मोठे भव्य दिव्य स्वरूपातील मंदिरात देवीची अंश स्वरूप मूर्ती आहे. पण कोणत्याही पुजा अर्चनेचा पहिला मान आधीच्या जागी द्यावा लागतो.

उद्या शनिवार
२१/१०/२३
उद्याच्या देवीचे सातवे रूप ‘कालरात्री’
उद्याच्या देवीची माहिती, फुंडे गावची ‘घुरबादेवी

माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page