उरण, अजय शिवकर
आजच्या देवीचे आठवे रूप ‘महागौरी’
गौर म्हणजे गोरा,सफेद.सफेद रंग शुद्धतेचे प्रतिक आहे.शुद्धता निरागसतेमधून येते.महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ.महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते.
आजची उरणची आठवी शक्ती डोंगरी गावाची ‘अंबादेवी‘

नावाप्रमाणे उंच डोंगरावर वसलेले हे गाव म्हणजे उरणच्या उत्तरेकडील बेट. फार वर्षापूर्वी जुनी लोकं सांगायची विहीर जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाजवळील देव संकट समयी हाकेला धावतो. खूप लोकांचे तसे अनुभव ही आहेत. लोक त्याला आंबजदेव म्हणत. पूर्वी छोटे असणारे मंदिर आता प्रशस्त मोठे आहे. पूर्वी खरे-खोट्याचा निवाडा करण्यासाठी कळ्या लावायचे. एकदा कळ्या लावताना जास्त चिटकलेला शेंदूर काढला गेला. तो तब्बल तीन परात झाला आणि आतुन कमरेवर हात ठेवलेली देवीची मूर्ती निघाली. तेव्हा पासून हा आंबज देव “अंबादेवी” संबोधली जाऊ लागली व तेव्हा पासून पालखी सुरू झाली .
उद्या सोमवार
२३/१०/२०२३
उद्याच्या देवीचे नववे रूप — सिद्धीदात्री
उद्या उरणच्या शक्तीची माहिती — पाणजे गावची अक्कादेवी
माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा.