खरोशी – पेण, धनाजी घरत
पेण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील जिते नाक्यावरून पूर्वेस साधारणतः दोन किलो मीटर अंतरावर पक्क्या डांबरी रस्त्याने जोडलं गेललं खरोशी गाव तसं बालगंगा नदीच्या काठी बसलेले. मुळत:च निसर्ग सानिध्य लाभलेल्या डोंगर दऱ्यांच्या कुशीत बसलेल्या या खरोशी गावाच्या उत्तरेस डोंगर माथ्यावर आहे. सर्वांच्या श्रद्धेचे श्री केळंबा देवीच मंदिर..
पेण परिसरातील व मुंबईपासून ७० कि. मी. अंतरावर असलेल्या व सर्वपरिचीत अशा भक्तांचे श्रद्धास्थान असणारी स्वयंभू, शाश्वत नी सदा जागृत असणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या वेळोवेळी संकटाच निवारण करणाऱ्या खरोशी येथील श्री केळंबादेवीची महती आपल्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे.
देवीच्या भक्तीपोटी, प्रेमापोटी व नवसापोटी देवळात दिवसरात्र वास्तव्य करून राहतात. नवरात्रीच्या उत्सवात नवस फेडण्यासाठी दूरशेत, जिते, बळवली, खारपाडा, गोर्विले, आंबिवली या पंचक्रोशीतील लोकांची खूपच रिघ लागलेली असते. देवीच्या वास्तवाचा, सकटकालीन दर्शनाचा अनुभव कित्येक लोकांना आल्यामुळे प्रत्येक वषी या भक्तगणातही खूपच वाढ झालेली दिसून येते. घटस्थापनेपासूनच्या नवव्या दिवशी श्री केळबादेवीची पालखी देवळातून निघून टाळ मृदुंगाच्या तालात भजन म्हणत गुलाल-बुक्का उधळत वाजत गाजत मिरवणुकीने पुन्हा गावात आणली जाते. अशा या जागृत, स्वयंम् व नवसाला पावणाऱ्या श्री केळंबा देवीचे मंदिर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून म्हणजे शके १६०७ मध्ये बांधले होते. आजपर्यंत चारशे वर्षे या मंदिरास झाल्याने सर्व गावकऱ्यांनी एक निश्चय केला व एक दिलाने एक मनाने मंदिराचा जिर्णोद्धार करून लाखो रुपयाचे भव्य दिव्य व आकर्षक मंदिर बांधले आहे. या मंदिरासाठी गावकरी मंडळीनी आपल्या समस्या अडचणी, संकट बाजूला सारून व भक्तगणांकडे मदतीचा हात मागून आज हे भव्य आणि दिव्य मंदिर उभे केले आहे.
माऊली केळंबा मातेचा नवरात्र उत्सव
१५ ऑक्टोंबर ते २३ ऑक्टोंबर असा नऊ दिवस चालणार आहे या नवरात्री नऊ दिवस भक्तगण मोठ्या श्रद्धेने नवस बोलण्यासाठी नवस फेडण्यासाठी येत असतात.नवरात्रीच्या उत्सवात नऊ दिवस लाखो भाविक दर्शन घेऊन डी. जे. च्या तालावर मनसोक्तपणे नृत्य करूनआनंद द्विगुणित करत असतात .