कर्जत, गणेश पुरवंत
नेरळ( पूर्व)च्यावतीने रविवार दिनांक २२ ऑक्टोंबर २०२३ रोजी रक्तदान शिबिरआयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी एकूण ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याप्रसंगी रक्तसंकलनाचे काम घाटकोपर येथील समर्पण रक्त संकलन केंद्र यांचे डॉ. एम.ए.शेख, धनश्री लाड, लता देसक, संजय ठोंबरे, पीयुष सिंघ, अनिकेत जाधव, साहिल पवार, सनी मोरे, शुभम जगताप व कृष्णा साठे यांनी केले. या प्रसंगी आमिरजी मणियार , प्रज्ञनेश खेडकर व गंगानगर येथील अनेक रहिवासी उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवतेज मित्र मंडळाचे तुषार म्हात्रे, मयूर कांबरी, वासुदेव गवळी, संदेश जाधव, मितेश भोईर, नितीन मनवे, पवन सोनावळे, प्रतीक सोनावळे, निवृत्ती कांबरी , रोशन सातवी व इतर अनेक कार्यकर्त्यांनी विशेष महेनात घेतली. रक्तदान ही केले त्याबद्दल शिवतेज मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी सर उपस्थित होते.