राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमास रायगडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

अलिबाग, अमुलकुमार जैन

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, रायगड जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग, तहसील कार्यालय अलिबाग, जिल्हा पोलीस दल, प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग, स्वयंसिद्ध संचलित स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग या सर्वांच्या माध्यमातून वरसोली समुद्रकिनारा, अलिबाग येथून राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये स्पर्धा विश्व अकॅडमीचे युवक युवती, रायगड पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहकारी यांसह बहुसंख्य रायगड कर सहभागी झाले होते. यावेळी या कार्यक्रमास उमाकांत कडनोर- तहसीलदार (सर्वसाधारण), जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग, तहसीलदार विक्रम पाटील, नायब तहसीलदार टोलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर, राखीव पोलीस निरीक्षक बाविस्कर, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी, आधार फाऊंडेशनचे धनंजय कवठेकर, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांसह अन्य मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना उमाकांत कडनोर- तहसीलदार, सर्वसाधारण यांनी प्रतिज्ञा दिली तसेच अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दौडला सुरुवात करण्यात आली. सदर दौडचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग येथे करण्यात आला. सर्व उपस्थितांचे आभार तहसील कार्यालय अलिबाग यांच्या वतीने अलिबाग तहसीलदार विक्रम देशमुख यांनी मानले. सदर दौड यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या सिद्धांत खंडाळकर यांसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page