अलिबाग, अमुलकुमार जैन
जिल्हा पोलीस दलातील श्वान गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत. गुन्हा घडताच तात्काळ हजर होऊन आरोपींचा मागोवा काढत तपास करण्यात श्वानांचा मोठा हातभार आहे.
एखादा खून, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर गुन्हे घडल्यानंतर त्यातील आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले असते. तांत्रिक तपास यंत्रणेच्या मदतीने तपास सुरू होतो मात्र तरीही अनेक अडचणी पोलिसांना येत असतात. अशावेळी डॉग स्कॉड पथकाची मदत महत्वपूर्ण ठरली जाते. मनुष्य बळाचे प्रयत्न अपुरे पडत असताना पोलीस दलातील जवान म्हणून काम करणारे श्वान हे आपल्या पोलीस सहकार्याच्या मदतीला धावून येतात आणि आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळवून देतात. रायगड पोलीस दलातील ऑक्सर या श्वानाने महाड येथील हत्येप्रकरणात महत्वाची भूमिका बजावली असून दोन्ही गुन्ह्याचा शोध पोलिसांनी काही तासातच लावून आरोपींना जेरबंद केले आहे. ऑस्कर सोबत इतर सहाही श्वान हे आपली कामगिरी चोख बजावत आहेत.
जिल्हा पोलीस दलातील श्वान गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत. गुन्हा घडताच तात्काळ हजर होऊन आरोपींचा मागोवा काढत तपास करण्यात श्वानांचा मोठा हातभार आहे. विशेष म्हणजे गुन्हे शोधण्यात रायगड श्वानांनी अव्वल स्थानही पटकावलेले आहे. यामुळे रायगड पोलिसांची मानही उंचावली आहे. अगदी हत्येपासून ते खुनाच्या अरोपी, श्वानांची भूमिका अग्रस्थानी राहिलेली आहे. श्वानांचे काम सध्या वेगवान सुरू असल्याने समाधान आहे.रायगड पोलीस याच्या खांद्याला खांदा लावून पोलीस दलात मर्फी, ऑस्कर, रॉकी, मॅक्स, ब्रुनो, रुफस, डस्टी हे श्वान आपली सेवा देत आहेत. यातील मर्फी , ऑस्कर , रॉकी, (गुन्हे शोधक) हे तीनही श्वान अनुभवी आहेत.
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस स्टेशन हद्दीतील बेलोशी विभागात झालेल्या खुनाचा छडा हा रायगड च्या श्चावान पथकाने तपास पूर्ण केले होते,. याचप्रकारे जिल्ह्यातील महाड तालुका, मुरुड, रसायनी येथील गुन्ह्याचा तपास 2022 या सालात तर 2023 मध्ये एक गुन्ह्याचा तपास यशस्वी पणे लावण्यात आला होता.
यामध्ये घटनास्थळी कसलाही पुरावा नव्हता. मात्र अनुभवी श्वानाने अधिकाऱ्यांना आरोपीच्या घरापर्यंत पोहचविले होते. त्यामुळे पोलिसांना या खूनाचा तपास करण्यात यश आले होते. त्याचप्रमाणे त्याचबरोबर घरफोडी गुन्हे शोधण्यास मदत केलेली आहे.
रायगड डॉग स्कॉड मध्ये पोलिस हवालदार दर्शन सावंत सहित मंगेश निगडे आणि निमेश माळवी आदी सहित इतर कर्मचारी तत्पर आहेत.ऑस्कर याचा जन्म 12 मार्च 2019 रोजी झाला असून डॉबर जातीचा हा श्वान आहे. 2020 साली ऑस्कर हा पोलीस दलात डॉग स्कॉड पथकात कार्यरत झालेला आहे. डॉग स्कॉडचे मंगेश निगडे आणि निमेश माळवी , दोन हँडलर पोलीस कर्मचाऱ्यांनी ऑस्करला प्रशिक्षित केले आहे. सकाळ, संध्याकाळ माळवी आणि निगडे हे ऑस्कर याचा गुन्ह्यातील आरोपीला सुगंधावरून कसे पकडायचे याचा सराव देत असतात. त्यामुळे अत्यंत कठीण गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यासाठी ऑस्कर हा तरबेज झाला आहे. सातही श्वानसाठी प्रत्येकी दोन हँडलर श्वान पथकात आहेत.
चोरी, दरोडा, खून यासह व्हीआयपी बंदोबस्त, सार्वजनिक ठिकाणे, मर्मस्थळांची तपासणीही या श्वानांमार्फत केली जाते. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकही गैरप्रकार घडला नाही. हे टाळण्यात श्वानांची भूमिका महत्वाची राहिली.असे असते श्वानांचे दिवसभराचे नियोजनसकाळी सहा वाजताच सर्वांना उठविले जाते. त्यांना शहराबाहेर नेऊन त्यांच्याकडून सराव करून घेतला जातो. सराव झाल्यानंतर त्यांना जेवण दिले जाते. त्यानंतर आराम असतो. एखादी घटना घडली तरच त्यांना बाहेर काढले जाते. त्यानंतर सायंकाळी पुन्हा एक तास सराव करून घेतला जातो. त्यानंतर जेवण आणि नंतर आराम, असे त्यांचे नियोजन आहे. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी पंखा, स्वच्छता, बाथरूम, पाणी इ. व्यवस्था करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात 2008 सालापासून डॉग स्कॉड पथक तयार करण्यात आले. पूर्वी लिली आणि मायलो हे दोन श्वान पोलीस दलात कार्यरत होते. दोन्ही श्वान यानीही अनेक गुन्हे आणि आरोपी शोधून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. लिली आणि मायलो याचा मृत्यू झाला असून आता ऑस्करसह सहा श्वान आज रायगड पोलीस दलात आपली सेवा चोख बजावत आहेत. स्फोटक शोधणे, अमली पदार्थ, हत्या, घरफोडी यासारख्या महत्वाच्या गुन्ह्यात हे श्वान पोलिसांना मदत करीत असतात. डॉग स्कॉड पथकामुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यात आणि आरोपीला लवकरात लवकर शोधण्यात ऑस्करसह इतर सहाही श्वान सेवा देत आहेत. त्यामुळे रायगड पोलिसांसोबत श्वानही पोलीस दलाचे नाव उंचावत असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.