महसुल विभागासह रेल्वे प्रशासन साखर झोपेत का ?
कर्जत प्रतिनिधी , गणेश पुरवंत
मनसेचे जितू पाटील यांची कारवाईची मागणी

मुंबई ट्रान्स हार्बर पनवेल – कर्जत या रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. तर या रेल्वे मार्गावर पूर्वी कार्यरत असलेल्या बोगद्या व्यतिरिक्त रेल्वे प्रशासनाकडून अजून दोन बोगदे निर्माण केले जात आहेत. तर सदर सुरू दोन बोगद्याच्या बांधकामातून मोठया प्रमाणात निघणाऱ्या दगड, मातीवर नियमाने रेल्वे विकास प्राधिकरणाची मालकी असताना, मात्र या कर्जत पनवेल रेल्वे बोगद्यातील दगड माती ही नियम हे सरासपणे पायदळी तुडवून बेकायदेशीरपणे विक्री केली जात असल्याने, मात्र महसुल विभागासह रेल्वे प्रशासनाचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने, महसुल विभागासह रेल्वे प्रशासन साखर झोपेत का ? असा प्रश्न मात्र जनतेकडून उपस्थित केला जात आहे. तर या संदर्भात संबंधितांवर कारवाई करण्यासाठी मनसे रायगड जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष व मनसे रेल्वे युनिट अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर पनवेल – कर्जत या रेल्वे मार्गावर सन . २००५ पासून एकेरी वाहतूक सुरु असून, उपनगरीय लोकल सेवा सुरु करण्यासाठी आणखी एक नवीन मार्ग बांधला जात आहे. तर पनवेल – कर्जत या २९ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गासाठी मुंबई रेल्वे प्राधिकरणाकडून शेतकऱ्यांच्या जमिनी या संपादन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या संपादीत केलेल्या जमिनीवर रेल्वेची मालकी आहे. नव्याने दोन बोगद्यांचे काम हे रेल्वे प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे. परंतू सदर रेल्वे मार्गासाठी संपादीत केलेल्या जमिनीवर रेल्वेची मालकी असताना, मात्र महसुल विभागासह रेल्वे प्रशासनाचे मोठया प्रमाणात नुकासान साखर झोपेत का ? ठेका प्राप्त ठेकेदारांकडून उत्खनन दरम्यान मोठया प्रमाणात निघणारा दगड व माती ही नियमांचे उल्लघन करत बेकायदेशीरपणे विक्री केली जात आहे. त्यावर महसूल व रेल्वे विभागाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते असल्याने, व महसुल व रेल्वे विभागाचे मोठ्या प्रमाणे अर्थिक नुकास होत असल्यामुळे मात्र महसुल विभागासह रेल्वे प्रशासन साखर झोपेत आहे का ? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे. किरवली येथे सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाबद्दल स्थानिक महसूल प्रशासनाने कारावाई करावी अशी मागणी ही काही ग्रामस्थांनी केली आहे. तर सदर प्रकल्पाचे काम हे ज्या तीन ठेका प्राप्त कंपनीकडून केले जात आहे. त्या माध्यमातून निघणारा दगड व माती असे सर्व साहित्य हे रेल्वे मार्ग बनविण्यासाठीच्या कामासाठी वापरण्यात येत आहे. असे
ठेकेदार कंपनी व्यवस्थापक रमेश गाढवे यांच्या कडून सांगण्यात येत आहे. तर आमच्याकडून या ठिकाणी बोगद्यामधून काढण्यात आलेले सर्व दगड हे बाजूच्या क्रशिंग मशीनवर पाठवण्यात येतात. तेथे काँक्रिटचा माल बनवून आम्ही बोगद्यातील रेल्वे मार्गाच्या कामासाठी वापरतो. त्यामुळे बोगद्यातून काढण्यात आलेले साहित्य हे बाहेर कुठेही पाठवले जात नाही. असे मध्य रेल्वेचे अधिकारी लक्ष्मण जनपांगे यांच्या कडून सांगण्यात येत आहे. तर या संदर्भात सामान्यान कडून येणाऱ्या तोंडी तक्रारीनुसार सदर कामातून निघणारा दगडांचा साठा हा पंचवटी भाग तसेच ममदापूर भागात साठा करून ठेवण्यात आल्याचे व ठेवलेल्या दगडांची पाहणी करून नेरळ तलाठी यांनी पंचनामा केला आहे. व त्याबाबत दंडात्मक कारवाई ही अद्याप झालेली नाही. असे संतोष जांभळे नेरळ महसूल मंडळ अधिकारी यांच्या कडून सांगण्यात येत आहे. सदर प्रकरणा बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आवाज उठविण्यात आला आहे. मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष व मनसे रेल्वे युनिट अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी याबाबत मुंबई येथे मध्य रेल्वे व्यवस्थापक आणि रेल्वे बोर्ड यांना निवेदन दिले आहे. रेल्वेच्या मालमत्तेची बेकायदेशीर व गैर पद्धतीने विक्री केल्याबाबद्दल संबंधित कामाची जबाबदारी असलेले रेल्वे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.