मुंबई, विरेश मोडखरकर
आरईसी ने नोंदवला 3,773 कोटी रुपयांचा आत्तापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा
केंद्र सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली ‘महारत्न’ कंपनी आणि आरबीआय मध्ये बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी), सार्वजनिक वित्तीय संस्था (पीएफआय) आणि पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी (आयएफसी), म्हणून नोंदणीकृत असलेल्या आरईसी लिमिटेड ने आज 2र्या तिमाहीचे 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या सहामाहीचे लेखापरीक्षण न झालेला आर्थिक अहवाल (स्वतंत्र) जाहीर केला.
आरईसी लिमिटेड चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विवेक कुमार दिवांगन यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत प्रमुख ठळक बाबींची माहिती दिली. यावेळी संचालक (प्रकल्प) विजय कुमार सिंह, संचालक (वित्त) अजय चौधरी, कार्यकारी संचालक (वित्त) संजय कुमार, कार्यकारी संचालक आणि कंपनी सचिव जे.एस. अमिताभ आणि कार्यकारी संचालक टीएससी बोश उपस्थित होते.
मुख्य ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
कार्यान्वयन आणि आर्थिक ठळक मुद्दे – आर्थिक वर्ष 23 च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 24 ची दुसरी तिमाही (स्वतंत्र)
मंजूरी: 84,889 कोटी रुपयांच्या तुलनेत 1,04,366 रुपये, 23% जास्त, अक्षय ऊर्जा क्षेत्राचा वाटा 24% आहे
वितरण: 17,827 कोटी रुपयांच्या तुलनेत 41,598 कोटी रुपये, 133% अधिक
कर्ज मालमत्तेवरील व्याज उत्पन्न: 9,534 कोटी रुपयांच्या तुलनेत 11,213 कोटी रुपये, 18% जास्त
निव्वळ नफा: 2,728 कोटी रुपयांच्या तुलनेत 3,773 कोटी रुपये, 38% वाढ
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न: 1,915 कोटी रुपयांच्या तुलनेत 4,188 कोटी रुपये, 119% जास्त
कार्यान्वयन आणि आर्थिक ठळक मुद्दे – आर्थिक वर्ष 23 च्या सहामाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 24 ची सहामाही (स्वतंत्र)
मंजूरी: 1,44,784 कोटी रुपयांच्या तुलनेत 1,95,163 कोटी रुपये, 35% जास्त, अक्षय ऊर्जा क्षेत्राचा वाटा 26% आहे
वितरण: 30,269 कोटी रुपयांच्या तुलनेत 75,731 कोटी रुपये, 150% अधिक
कर्ज मालमत्तेवरील व्याज उत्पन्न: 18,796 कोटी रुपयांच्या तुलनेत 21,678 कोटी रुपये, 15% वाढ
निव्वळ नफा: 5,176 कोटी रुपयांच्या तुलनेत 6,734 कोटी रुपये, 30% अधिक
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न: 3,690 कोटी रुपयांच्या तुलनेत 7,331 कोटी रुपये, 99% जास्त
सुधारित मालमत्तेची गुणवत्ता, कर्जदरात वाढ आणि वित्त खर्चाचे प्रभावी व्यवस्थापन यामुळे, आरईसी ने 3,773 कोटी रुपयांचा आत्तापर्यंतचा सर्वोच्च तिमाही नफा नोंदवला आहे. परिणामी, 30 सप्टेंबर 2022 रोजी प्रति समभाग 39.32 रुपये मूल्याच्या तुलनेत 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत प्रति समभाग 51.14 रुपये मूल्य वार्षिक मिळकत झाली.
नफ्यातील वाढीमुळे, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत गेल्या वर्षाच्या तुलनेत 18% वृद्धीसह निव्वळ मिळकत 63,117 कोटी रुपये झाली आहे.
कर्ज वहीच्या वाढीत सातत्य राहत 30 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या 3.94 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 20% वाढ नोंदवत ते 4.74 लाख कोटी रुपये झाले आहे. नुकसानातील निव्वळ पतपुरवठा मालमत्ता 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अनुत्पादित मालमत्तेवरील 69.37% तरतुदी सुविधा प्रमाणासह 0.96% पर्यंत कमी झाल्याने मालमत्तेची गुणवत्ता सुधारण्याचे हे द्योतक आहे.
भविष्यातील वाढीला समर्थन देण्याची पुरेशी संधी दर्शवत, 30 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीचे भांडवली पर्याप्तता गुणोत्तर (सीआरएआर) 28.53% वर आहे.