कर्जत, गणेश पूरवंत

माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माधवी जोशी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून माधवी जोशी यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस मावळ लोकसभा निरीक्षक पदी तर नरेश जोशी यांची महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य पदाची जबाबदारी दिली आहे.

मागील काही महिन्यांमध्ये मावळ मतदारसंघात माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठानकडून वेगवेगळे सामाजिक उपक्रम हे राबवण्यात येत आहेत. जन सामान्यांना प्रतिष्ठानकडून मदत केली जात आहे. तर मावळ लोकसभा मतदार संघातील समस्यांना वाचा फोडण्याचे नुसते कामच नाही तर त्यावर उपाययोजना देखील केल्या जात आहेत. यासह माधवीताई जोशी यांच्या सामाजिक कार्याला प्रेरीत होत महीलाशक्ती मोठ्या संख्येने प्रतिष्ठान सोबत जोडली गेली आहे. अशात मावळ मतदारसंघात झालेली व सुरू असलेली मोठी राजकीय उलथापालथ होतानाचे चित्र असताना, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माधवी जोशी यांनी आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात माधवी जोशी व त्यांचे पती नरेश जोशी हे आज आपल्या करीत कार्यकर्त्यांसोबत मोठ्या संख्येने दाखल झाले. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत माधवी जोशी यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस मावळ लोकसभा निरीक्षक पदी तर नरेश जोशी यांची महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती करत मोठी जबाबदारी दिली आहे. यामुळे मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद निर्माण झाली आहे.