कर्जत, गणेश पुरवंत

भिवपुरी रोड स्टेशन वरील वाढती वाहतूक पाहता ह्या प्रवासी वर्गाकरिता हक्काची सर्व प्रश्न सोडवण्यासाठी एक प्रवासी संघटना असावी ह्या साठी चार वर्षांपूर्वी भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना आसपासच्या परिसरातील लोकांनी एकत्रित येऊन स्थापन केली आणि आज ह्या प्रवाशी संघटनेचा चौथा वर्धापन दिन भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन वर उत्साहात साजरा करण्यात आला.

भिवपुरी परिसरातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी इतर संघटनांसारखी एक संघटना असावी या गोष्टीची जाणीव सर्व प्रवाश्यांना झाली आणि म्हणून भिवपुरी रोड स्टेशन परिसरातील सर्व प्रवासी वर्ग एकत्रित येऊन एक संघटना स्थापन केली. या संघटनेच्या अध्यक्षपदी डिक सळ येथील किशोर गायकवाड यांची वर्णी लागली आणि नंतर या संघटनेच्या माध्यमातून प्लॅटफॉर्मवर अनेक कामे चालू झाली आहेत. कर्जत कडील बाजू मुंबई कडील बाजू कडे लिफ्ट चे काम चालू आहे . तसेच स्टेशन वरील स्वच्छता आवश्यक ठिकाणी लागणारी वीज आणि पाणी सोय तसेच इंडिकेटर या अन अश्या अनेक कामाची पूर्तता ह्या चार वर्षात या संघटनेकडून करण्यात आली आहे. म्हणूनच १७ नोव्हेंबर रोजी भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेचा चौथा वर्धापन दिन भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन ऑफिस मध्ये साजरा करण्यात आला.यावेळी मुख्य बुकिंग पर्यवेक्षक श्री एम जी म्हसे यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला. यावेळी उपस्थित स्टेशन मॅनेजर एस ए पांडेन सर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रायगड भूषण किशोर गायकवाड, रवींद्र राऊत होमगार्ड, रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.