कर्जत, गणेश पुरवंत
विश्व हिंदू परिषद – बजरंग दल मातॄ शक्ती,दुर्गा वाहिनी कर्जत प्रखंड गीता जयंती निमित्त रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी कपालेश्वर मंदिर टिळक चौक कर्जत येथे सकाळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी एकूण १०७ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय, सामाजिक व मानवतावादी कार्य करून सहकार्य केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतमाते च्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून रायगड जिल्ह्याचे विश्व हिंदू परिषदेचे विभाग प्रमुख प्रसन्नजी खेडेकर, विशाल जोशी, साईनाथ श्रीखंडे, सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी इत्यादीच्या शुभ हस्ते झाले.
रक्तसंकलनाचे काम घाटकोपर येथील समर्पण रक्तपेढीचे डॉ.रमेश सिंग, लक्ष्मणकाका नाईक,धनश्री लाड,अनिता कवरनकर,अमित मौर्य,प्रदीप नितोरे, निकेश ताम्हणकर,संजय ठोंबरे,महेश गोरीवले,विपुल सिंग,सूरज जाधव,मंगेश गौरात इत्यादी कर्मचाऱ्यांनी उत्तम पद्धतीने केले त्याबद्दल त्या सर्वांचे आयोजकांकडून मनःपूर्वक आभार व्यक्त केले. रक्तदात्याने रक्ताचा तुटवडा भरून काढत कर्जत खालापूर तालुक्यातील ५०० शिबीराचा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचे ध्येय आहे.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद कर्जत प्रखंडा चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विषेश परिश्रम घेतले, त्याबद्दल सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी सर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मांडले.