जिल्हा बँकेचे जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्वाचे योगदान तसेच ५००० कोटीचा व्यवसाय पूर्ण

सहकार आयुक्तांकडून बँकेचे दुहेरी अभिनंदन

अलिबाग, अमूलकुमार जैन

रायगड जिल्हा सहकारी बँक म्हणून काम करत असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना पूर्ण करत असतानाच रायगड जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्वाचे योगदान दिले आहे आणि ५००० कोटीचा व्यवसाय देखील पूर्ण केला आहे त्याबद्दल बँकेचे दुहेरीमहाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था अनिल कवडे यांनी केले.

यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था-रायगड प्रमोद जगताप, नाबार्ड डीडीएम प्रदीप अपसुंदे, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, बँकेचे संचालक संतोष पाटील, ज्ञानेश्वर भोईर, महेश म्हात्रे, किसन उमटे तसेच बँकेचे चिफ मॅनेजर भारत नांदगांवकर हे व्यासपिठावर उपस्थित होते.
सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था अनिल कवडे
यांनी यावेळी सांगितले की,सहकारी संस्थांच्या वाटचालीकरीता आधुनिकता तसेच नविन व्यवसाय अंगिकारणे किती आवश्यक आहे याबाबत सखोल मार्गदर्शन करीत असताना रायगड जिल्हा बँकेने केलेले आधुनिक बदल हे महत्वपूर्ण आहे. त्यामुळेच जिल्हा बँकेचे नाव हे महाराष्ट्रात नव्हे तर देशात आहे.तसेच राज्यातील सहकारातील आदर्शवत बँक म्हणून रायगड जिल्हा सहकारी बँक म्हणून काम करत असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना पूर्ण करत असतानाच रायगड जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्वाचे योगदान दिले आहे आणि ५००० कोटीचा व्यवसाय देखील पूर्ण केला आहे त्याबद्दल बँकेचे दुहेरी अभिनंदन केले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना बँकेच्या वतीने विविध कार्यकारी संस्थांना वेळोवेळी सहकार्य केले जात असून संस्थांनी बँकेप्रमाणेच आधुनिकता आणि गतिमानता यासाठी येणा-या काळात तत्पर राहण्याचे आवाहन केले. तसेच बँकेचे चेअरमन आमदार भाई जयंत पाटील यांच्या दुरदृष्टीकोनातून सहकाराचे रोल मॉडेल असणा-या सहकारी संस्था होण्यासाठी प्रयत्नशिल राहण्याचे आवाहन केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page