उरण, प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे गावात USA वरून आलेल्या पाहुण्यांनी माता गट आणि हमारा गाव चे उपक्रम घेतले समजून.
समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई आणि प्रथम एजुकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निपुण महाराष्ट्र हे अभियान प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मूलभूत भाषिक आणि गणितीय कौशल्य प्राप्त करण्यासाठी मातापालक गटाच्या सहभागाने राज्यभर राबविले जात आहे. याच माता गट आणि उरण मधील आमचे गाव हा उपक्रम समजून घेण्यासाठी USA वरून पाहुणे आले होते.
या भेटी चे उद्देश्य प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन चे उरण मध्ये चालत असलेल्या उपक्रमांची माहिती घेणे, यात शाळेत प्रत्यक्ष शाळा पूर्व तयारी, मेळावा, डेमो , शाळेतील लर्निग कॅम्प, प्रत्यक्ष गावात जावून माता गटांना भेटी देणे होता , आणि त्यांच्या सोबत संवाद साधणे होता . माता गटांसोबत आलेल्या पाहुण्यांनी छान संवाद साधला .
डिनयार डेव्हिट्रे (डिनी) – जागतिक बिझनेस सल्लागार आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे वाईस चेअरमन (अमेरिका. USA), स्मितीन ब्रीद – बालशिक्षण आणि संगोपन तज्ञ, प्रथम एज्युकेशन , हेमलता ससाणे – कार्यक्रम समन्वयक (निपुण महाराष्ट्र), प्रथम, भोजराज क्षीरसागर – कोकण विभाग कार्यक्रम समन्वयक (आमचे गाव ) प्रथम, उरण पेण ब्लॉक मधील प्रथम प्रतिनिधी आणि शाळेतील मुख्याध्यापक बबन पाटील सर आणि सर्व शिक्षक वृंद ,शाळा वेवस्थापन कमिटी , आवरे ग्रुप ग्रामपंचच्या सरपंच मॅडम निराबाई पाटील . या सर्वांच्या उपस्थितीत आलेले पाहुण्यांचे आभार प्रदर्शन झाले आणि कार्यक्रमाची सांगता झाली .