डहाणू नगरपरिषद कर्मचारी हल्ला प्रकरणी कारवाईची मागणी

विशेष प्रतिनिधी

पोस्टरवर कारवाई दरम्यान कर्मचाऱ्यावर केला होता हल्ला.

हल्लेखोरावर कारवाई होईपर्यंत काळी फित बांधून कर्मचारी काम करणार.

मा.न्यायालयाच्या आदेशान्वये PIL 155 /2011 संदर्भात अनधिकृत पोस्टर्स वर कार्यवाही करण्यासाठी डहाणू नगरपरिषद मधील कर्मचाऱ्यांचे पथक कर्तव्यावर असताना एका समाजकंटकाने रागाने पथकाला शिवीगाळ केली व धक्काबुक्की करून एक कर्मचाऱ्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

कर्मचाऱ्यावरील हल्ला प्रकरणी निषेधार्थ म्हणून दि.18-12-2023 रोजी पासुन डहाणू नगरपरिषद कर्मचारी यांनी हल्लेखोरास अटक होईपर्यंत बेमुदत काम बंद केले आहे. तसेच पालघर जिल्हयातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायती मधिल सर्व कर्मचाऱ्यांनी आपआपल्या कार्यालयात काळया फिती लाऊन निदर्शने करून भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. सदरच्या आंदोलनास व कर्मचाऱ्यांचे मनोधर्य वाढवण्यास म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार व सरचिटणीस अनिल जाधव माहिती मिळताच आंदोलनाच्या ठिकाणी डहाणू नगरपरिषद येथे उपस्थित राहून हल्ल्या प्रकरणी संबंधीत पोलीस अधिकारी व मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा करून, न्याय प्रस्थापित करून, हल्लेखोरास कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page